मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत हिनं चर्चेत राहण्याची एकही संधी सोडलेली नाही. शेतकरी कायदे असो, बॉलिवूडमधील घराणेशाही असो किंवा मग रिअॅलिटी शो असो. ही अभिनेत्री एकतर तिच्या फॅशन सेन्समुळं किंवा मग तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं कायमच चर्चेत राहिली. (Kangana Ranaut Kissing Video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना चर्चेत येण्यासाठी कोणतंही कारण पुरेसं असतं. त्याचीच प्रचिती सध्या येत आहे. कारण, आता तिच्यावर नजरा खिळण्यास कारणीभूत ठरत आहे ते म्हणजे तिचा व्हिडीओ. 


कंगनाच्या या व्हिडीओमध्ये ती कुणाचीही तमा न बाळगता एका व्यक्तीला जवळ घेत त्याला अविरतपणे किस करताना दिसत आहे. 


नुकतंच एका 'लॉक अप' नावाच्या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन केल्यानंतर कंगनानं पुन्हा एकदा तिचा मोर्चा आगामी चित्रपटांच्या दिशेनं वळवला. यानंतर लगेचच तिचा हा व्हिडीओ समोर आला आहे. 


व्हिडीओमध्ये कंगना एका व्यक्तीला सतत Kiss करताना दिसत आहे. बरं कंगना किस करेल याची त्या व्यक्तीलाही कल्पना नसल्यामुळं तोसुद्धा थक्क होत तिच्याकडे एकटक पाहत आहे. 



बी- टाऊनची ही क्वीन कंगना ज्याला किस करतेय तो दुसरातिसरा कोणी नसून, 'लॉक अप' स्पर्धक शिवम सिंह आहे. या व्हिडीओच्या निमित्तानं शिवम आणि कंगनाची केमिस्ट्री नेटकऱ्यांना आवडली आहे. 


'लॉक अप' या रिअॅलिटी शोला प्रचंड प्रसिद्धी मिळाली असतानाच एकता कपूर आणि कंगनानं मिळून एका ग्रँड पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी पार्टीला रिअॅलिटी शोमधीस बऱ्याच स्पर्धकांची उपस्थिती पाहायला मिळाली. त्याच पार्टीतले काही क्षण या व्हिडीओतही पाहता येत आहेत.