मुंबई: राजकीय आणि कलाविश्व हे काही गोष्टींमुळे जोडलं गेलेलं आहे. मुळात याची उदाहरणं अनेकदा पाहायला मिळाली आहेत. सध्याच्या घडीला ही दोन्ही क्षेत्र एकाच कारणामुळे चर्चेत आली आहेत. ज्यासोबत अभिनेत्री करिना कपूर खान आणि सध्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं नाव जोडलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदी कलाविश्वात अत्यंच प्रतिष्ठेच्या अशा समजल्या जाणाऱ्या कपूर कुटुंबातील एक सदस्य असल्यामुळे करीनाने नेहमीच काही गोष्टींना प्राधान्य दिलं. ज्यामध्ये कुटुंबाची शान अग्रस्थानी होती. 


आपल्या कुटुंबाभोवती असणारं वलय पाहता करीनानेही या कलाविश्वात तिची अशी वेगळी जागा प्रस्थापित केली. 


करीनाच्या खासगी आयुष्याविषयीही बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या. २०१२ मध्ये तिने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. पण, लग्नापूर्वी ती एका राजकीय व्यक्तीमत्त्वाच्या प्रेमात होती हेही तितकच खरं. 


पत्रकार राशिद किडवई यांच्या 'नेता अभिनेता : बॉलिवूड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स’ या पुस्तकात याविषयीचा खुलासा करण्यात आला आहे. 


‘टाईम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, सैफशी विवाहबंधनात अडकण्यापूर्वी करिनाने फरदीन खानला डेट केलं. इतकचं नव्हे तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे तिचं क्रश होतं असं तिने २००२ मध्ये कबूल केलं होतं. 


खुद्द राहुल गांधीदेखील तिचा प्रत्येक चित्रपट 'हा फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहत असे, असंही राशिद यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलं आहे.


अभिनेत्री सिमी गरेवालच्या 'रेंदेवझ' या टॉक शोमध्येही तिने याविषयी वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं होतं. 


तुला कोणत्या व्यक्तीला डेट करायला आवडेल, असा प्रश्न विचारला असता करिनाने राहुल गांधी यांचं नाव घेतलं होतं.



सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा व्हिडिओही बराच चर्चेत आला आहे. 


‘मी राहुल गांधीना तसं फारसं ओळखत नाही. ते एक राजकारणी आहेत हीच माझ्यासाठी त्यांची ओळख आहे. मला माझ्या कुटुंबाकडून कलेचा वारसा मिळाला आहे. तर राहुल गांधींना राजकारणाचा त्यामुळे आमची भेट झाली तर नक्कीच खूप चांगल्या गप्पा रंगतील. त्यामुळे त्यांना डेट करायला आवडेल’, असं ती म्हणाली होती.



करीनाला नेमकं काय म्हणायचं होतं?


सिमी गरेवाल यांच्या टॉक शोमध्ये राहुल गांधी यांना डेट करण्याविषयीचं वक्तव्य केल्यानंतर २००९ मध्ये करीनाने तिचं विधान मागेही घेतलं. ‘गांधी आणि कपूर ही दोन्ही कुटुंब अतिशय नावाजलेली आहेत. त्यामुळे टॉक शोमध्ये मी असं म्हणाले होते. मात्र माझ्या मनात तसं अजिबात नाही. पण कधी संधी मिळाली तर त्यांचं आगत्य करायला मला नक्कीच आवडेल. विशेष म्हणजे ते देशाचं पंतप्रधान झाले तर मला जास्त आनंद होईल, पण म्हणून त्यांना डेट करणं मला आवडेल असं मी कधीच म्हणणार नाही’, असं स्पष्टीकरण तिने दिलं होतं.