Kiara Advani and Juhi Chwala : कियारा अडवाणी आणि शाहीद कपूर नुकतेच करण जोहरच्या शोमध्ये आले होते. कॉफी विथ करणचा सातवा सिझन सध्या सगळीकडेच धुमाकुळ घालतो आहे. या शोमध्ये फक्त टाईमपास असतो हे सर्वांनाच माहित आहे त्याचबरोबर सेलिब्रेटींच्या पर्सनल, सेक्स आणि रिलेशनशिप्सच्या लाईफबद्दल करण जोहर त्यांना प्रश्न विचारतो आणि त्यावरून नुसती सगळीकडे कॉन्ट्रोव्हर्सी सुरू होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमीप्रमाणे या शोमध्ये आलेल्या कियारा आणि शाहिद कपूरला त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल हटके प्रश्न विचारण्यात आले. यावेळी कियाराने सांगितलेला किस्सा ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 


कियाराने खुलासा केला आहे की एकदा तिने जुही चावला यांच्या पार्टीत असे काही केले होते ज्यामुळे जुही यांना खूप लाजल्यासारखे झाले होते. हे जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 


कियारा आणि शाहिदला विचारण्यात आले की त्यांनी कधी पार्टीत लाज वाटली आहे का? ज्याला कियारा सहमत झाली आणि करणने लगेच आश्चर्याने विचारले, "तू?" कियारा म्हणाली, "होय, मी तुम्हाला एक किस्सा सांगते. ही माझी सर्वात लाजिरवाणी गोष्ट होती. ही गोष्ट मी अभिनेत्री होण्यापूर्वीची आहे. हा किस्सा सुजॉय घोष यांच्याशी संबंधित असल्याचा गौप्यस्फोट कियाराने केला. 


कियारा म्हणाली, "जुही चावला या आमच्या खूप जवळच्या फॅमिली फ्रेन्ड आहेत. त्यांना माहित होते की मला चित्रपटात यायचे आहे. त्यांनी 2010 मध्ये 'आय एम' हा चित्रपट केला होता, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यासाठी त्यांनी एक पार्टी आयोजित केली होती. मलाही या पार्टीत आमंत्रित केले होते कारण त्यांना माझी सुजॉय घोषशी ओळख करून द्यायची होती. म्हणून मीही गेले. मी सुजॉय घोष यांच्याशी बोलत होते आणि अचानक त्यांना हात वर केला. मला वाटलं ते मला निरोप देतायत. पण तसं नव्हतं. माझ्या पाठीमागून त्यांच्या ओळखीची एक व्यक्ती आली होती परंतु याचा मी विचारच केला नाही आणि तेवढ्यात मी त्यांना मिठीच मारली. 


हे पाहून जूही चावलांना खूपच लाजल्यासारखे वाटले. हा किस्सा सुजॉय यांना आठवत नाही परंतु या प्रकारामुळे मात्र जूही चावला या खूपच नर्व्हस झाल्या. 


हा किस्सा ऐकून करण जोहर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.