मुंबई : चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या नावाप्रमाणेच खऱ्या अर्थानं धकधक गर्ल आहे. अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या माधुरीनं जीवनातील प्रत्येक टप्प्यावर काही महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य दिलं आहे. कुटुंब हे त्यापैकीच एक. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परदेशात बरीच वर्षे वास्तव्यास राहिल्यानंतर माधुरी तिच्या कुटुंबासह भारतात परतली आणि आता इथेच ती कुटुंबासह वास्तव्यास आहे. माधुरी कामात कितीही व्यग्र असली तरीही ती कुटुंबालाही कायम प्राधान्यस्थानी ठेवते. याचाच एक भाग म्हणजे ती मुलांना शक्यतोपरी स्वावलंबी बनवण्याच्या प्रयत्नांत असते. काही व्हिडीओंच्या माध्यमातून हेच स्पष्ट होत आहे. 


काही दिवसांपूर्वीच माधुराच्या पतीनं म्हणजेच डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यांचा मुलगा अरीन चक्क स्वयंपाक बनवताना दिसला. मुलानं आपण बनवलेला पदार्थ सर्वप्रथम माधुरीनं त्याच्या वडिलांना चाखण्यासाठी दिला. त्यावेळी पदार्थ कसा झाला असे, या विचारानं माधुरी मजेशीर अंदाजातच काहीशी संकोचलेली दिसली. 




पण, वडिलांनी मात्र आपल्या मुलानं केलेल्या पदार्थाची चव चाखत त्याला पसंती देत आपल्याला त्याच्या या कामगिरीच कौतुक आणि गर्व वाटत असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. मुलाला प्रोत्साहन देण्याचा सेलिब्रिटी जोडीचा हा अंदाज सर्वांचीच मनं जिंकून गेला.