Mahima Chaudhry Accident:  परदेस चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या महिमा चौधरीने कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली.  आपल्या करिअरच्या पहिल्याच चित्रपटात ती शाहरुख खानसोबत दिसली होती. यानंतर तिने एकामागोमाग एक ब्लॉकबस्टर सिनेमा दिले. दिल है तुम्हारा, दाग, धडकन आणि दिल क्या करे यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली. करिअरच्या शिखरावर असताना तिला एका जीवघेण्या अपघाताला सामोरे जावे लागले. महिमा करिअरच्या टॉपवर तेव्हाच हा अपघात झाला. काय होती घटना? यामुळे महिमाच्या करिअरवर काय परिणाम झाला? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघतात महिमाचा चेहरा खराब झाला आणि त्यासोबत तिचा आत्मविश्वासही डळमळला. यामुळे महिमाच्या करिअरला मोठी हानी पोहोचली आणि ती मागे पडली. ज्या चेहऱ्यामुळे ओळख मिळाली होती, तो चेहरा विद्रूप झाला होता. एका मुलाखतीत महिमा या अपघाताविषयी मन मोकळेपणाने बोलली होती. 


अपघातामुळे महिमाचे आयुष्य बदलले


माझा एक रस्ता अपघात झाला ज्यामुळे माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. मी कारने शूटिंगच्या ठिकाणी जात होते तेव्हा चुकीच्या बाजूने दुधाचा ट्रक आला आणि आमच्या कारला धडकला, ज्यामुळे मोठा अपघात झाला. या अपघातात मला खूप जखमा झाल्या. मी मरतेय असे मला वाटले आहे. त्यावेळी मला दवाखान्यात नेण्यासाठी कोणीही मदत केली नाही, असे महिमाने सांगितले.


माझी आई आणि अजय देवगण तिथे पोहोचल्यावर मी खूप उशिराने हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकले, असे तिने सांगितले. माझा चेहरा बघून मी घाबरले होते. जेव्हा माझी शस्त्रक्रिया झाली तेव्हा डॉक्टरांनी माझ्या चेहऱ्यावरुन काचेचे 67 तुकडे काढले, असे महिमाने मुलाखतीत सांगितले.


त्यावेळी आपण अपघाताबाबत उघडपणे का बोललो नाही, याचा खुलासा देखील महिमाने यावेळी केला. अपघाताबद्दल वाच्यता केली असती तर चेहरा खराब झाल्याच्या कारणाने निर्मात्यांनी दुसऱ्या अभिनेत्रीला साइन केले असते, अशी भीती त्यावेळी होती असे तिने सांगितले. 


मासिकाने उडवली होती  खिल्ली 


अपघातानंतर महिमाच्या चेहऱ्यावर अनेक जखमा होत्या. त्यावेळी या अपघाताच्या घटनेवरुन एका मासिकाने तिची खूप खिल्ली उडवली होती. मासिकाने मुखपृष्ठावर माझा फोटो प्रकाशित करून माझ्या चेहऱ्याची खिल्ली उडवली, असे महिमा म्हणाली होती. मॅगझिनने गुपचूप सेटवर येऊन माझा फोटो काढला होता आणि नंतर माझ्या चेहऱ्यावरच्या खुणा दाखवून माझी खिल्ली उडवली होती. त्यामुळे मला खूप त्रास झाला होता, अशी आठवणही तिने सांगितले.