मुंबई : अभिनेत्री, मॉडेल मलाका अरोरा ही कायमच तिच्या मादक सौंदर्यासाठी ओळखली जाते. मलायका रुपेरी पडद्यावर ज्या अंदाजात दिसते, तो अंदाज शब्दांत व्यक्त करणं तसं कठीणच. हीच मलायका तिच्या खासगी आयुष्यातही ज्या धीरानं वावरत आहे हे पाहूनही अनेकांनाच तिचा हेवा वाटतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायकानं 2017 मध्ये तिच्या खासगी आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला होता. जवळपास 19 वर्षांनंतर ती अरबाज खान याच्यासोबतच्या वैवाहिक नात्यातून वेगळी झाली होती. 


मलायकाला या घटनेनंतर अनेकांच्या रोषाचाही सामना करावा लागत होता. काहींनी तिची जोरदार खिल्ली उडवली होती. 


मलायका घस्फोटानंतरही तिच्याच अंदाजात, सुंदर मेकओव्हरमध्ये बाहेर वावरत होती. पण, अनेकांच्याच ही बाब पचनी पडली नव्हती. 


मलायकाच्या अनेक फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट्सचा पाऊस पडला. अखेर यावर तिनंच मौन सोडत स्वत:साठीच उभं राहण्याचा निर्धार केला होता. 


पतीला घटस्फोट देऊन मिळालेल्या पोटगीच्या पैशांवर मजा मारतेय, वगैरे अशा आशयाच्या कमेंट्सना उत्तर देत, मी अशा प्रकरणांमध्ये पडतच नाही, कारण माझी स्वत:ची अशी एक प्रतिमा आहे आणि तुम्ही माझ्याबाबत काहीच जाणत नाही, अशा शब्दांत तिनं कमेंट्स करणाऱ्यांना सुनावलं होतं. 



तुम्हाला माझ्याबाबत माहिती असेल, तेव्हाच या अशा प्रतिक्रिया द्या. इतरांच्या आयुष्यात डोकावण्यापेक्षा दुसरं काहीतरी काम करा, असं म्हणत तिनं आपल्यावर टीका करणाऱ्यांना फटकारलं होतं.