मुंबई : मलायका ही कायमच तिच्या सौंदर्यासाठी आणि फिटनेससाठी चर्चेत असते. इतकंच नव्हे, आता मलायका तिच्या आणि अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबतच्या नात्यामुळेही सर्वांच्या नजरा वळवत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाची तमा न बाळगता रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या मलायकानं कायमच काही गोष्टींचा आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे. 


जीम असो किंवा मग एखादा इव्हेंट, प्रत्येक ठिकाणी ग्लॅमरस लूकमध्ये जाण्यालाच ती प्राधान्य देताना दिसते. पण, तुम्हाला माहितीये का, एकदा मलायकासोबत काहीसा विचित्र प्रसंग घडला होता. 


इन्स्टा स्टोरीमधूनच तिनं याबाबतची माहिती देत सर्वांना धक्का दिला. 


या कोरोनामुळं आपल्याला वेड लागणार आहे. वेडेच झालोय आपण... 


'मी एका हॉटेलमध्ये बाथरूममध्ये गेले, हाताच्या कोपरानं मी दार उघडलं. पायानंच टॉयलेट सीट वर केली. पाण्याचं बटण टीशूचा वापर करत सुरु केलं. हात धुतले , पुन्हा बाथरुन हाताच्या कोपरानंच खोललं, 


शेवटी माझ्या टेबलवर परत आले. तिथे आल्यावर माझ्या लक्षात आलं, मी तर पँट वर करायलाच विसरलेले...', असं मलायकानं सांगितलं. 


या एका प्रसंगामुळे तिला अर्थातच अतिशय खजिल झाल्यासारखं वाटलं असणार यात शंका नाही. 



मलायकानं हा प्रसंग सर्वांसोबत शेअर करताच अनेकांच्या तितक्याच वेगळ्या समोर आल्या. 


दरम्यान, सध्या मलायका तिच्या जीवनातील सुंदर काळ अनुभवत आहे. अर्जुनसोबतच्या नात्यातही तिला स्थैर्य मिळालं आहे. तेव्हा आता ही जोडी त्यांच्या नात्याला नव्या टप्प्यावर केव्हा नेते याचीच उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.