मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा हिनं 90 च्या दशकापासून ते अगदी काल- आजपर्यंत प्रत्येक वेळी चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला. बरं, दिवस पुढे जातात तसतसं कोणा एका व्यक्तीचं वय वाढतं. पण, मलायका जणू याला अपवाद आहे. कारण, तिचं वय वाढत असलं तरीही याचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर किंवा फिटनेसमध्ये दिसून येत नाही. (bollywood Actress malaika arora uses these home remedies for flawless skin)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उलट दिवसाआड ती आणखी सुंदरच होत चालली आहे. Aged like a fine wine... असंच तिचं सौंदर्य पाहून अनेकजण म्हणताना दिसत आहेत. 48 वर्षांची असूनही तिची त्वचा इतकी चमकदार कशी, काय करते मलायका? असेच प्रश्न तुम्हालाही पडत असतील ना? 


अखेर ते गुपित समोर आलं आहे. अगदी घरात असणाऱ्या काही गोष्टींपासूनच मलायकानं तिचं सौंदर्य टिकवल्याचं म्हटलं जातं. तुम्हीही करुन पाहा हे उपाय... 


स्क्रब 
कॉफी पावडर, ब्राऊन शुगर आणि तेल या गोष्टींचा वापर करत तयार करण्यात आलेलं स्क्रब मलायका वापरते. यामुळं त्वचेचा मृत भाग निघून जातो. यामध्ये ती खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलाचा वापर करते. हे स्क्रब वर्तुळाकार गतीनं चेहऱ्यावर लावल्यास आणि पाण्यानं स्वच्छ धुतल्यास फरक जाणवेल. 


कोरफड 
घरात असणारं कोरफडाचं पातंही तुमच्या त्वचेचं सौंदर्य वाढवण्यास मदत करेल. कोरफडाच्या पात्यातील गर काढून तो चेहऱ्यावर लावा, मसाज करा. काही वेळानंतर चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवा. पाहा किती फरक दिसतो. 


दालचिनी मास्क 
मलायकाला अॅक्नेचा साना करावा लागला आहे. पण, यावर उपाय म्हणून ती दालचिनीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावते. यासाठी एक चमचा दालचिनी पावडर, एक लहान चमचा मध, एक चमचा लिंबाचा रस या गोष्टी एकत्र करुन फेस पॅक तयार करते. 15 मिनिटं हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यामुळं बराच फरक दिसतो. आठवड्यातून हा मास्क दोन ते तीन वेळा लावला जातो. 


चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर तो मॉईश्चराईज करायला विसरु नका. मलायकानं तर या टीप्सच्या बळावर सुंदर त्वचा जपली. तुम्ही कसली वाट बघताय?