मल्लिकाच्या `त्या` सवयीमुळे बॉयफ्रेंडला रात्री होतो त्रास
खासगी आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडा केला.
मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या ग्लॅमरस अदांनी सर्वांच्याच काळजाचा ठाव घेणाऱ्या अभिनेत्री मल्लिका शेरावत हिनं पुन्हा एकदा कलाविश्वात एंट्री घेतली आहे. काही काळाच्या विश्रांतीनंतर मल्लिका आता नव्या जोमानं आणि नव्या अंदाजात परतली आहे. यावेळी ही सौंदर्यवती तिच्या अदांमुळे कमी आणि रिलेशनशिपमुळे जास्त चर्चेत आहे.
हल्लीच एका मुलाखतीदरम्यान, मल्लिकानं तिच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडा केला. प्रेमाविषयीही तिनं मनमोकळ्या गप्पा मारल्या.
गेल्या बऱ्याच काळापासून आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगत याच व्यक्तीसोबत ती भविष्याची आखणी करत असल्याचंही सांगितलं.
मल्लिकानं तिच्या प्रियकराचं नाव सांगितलेलं नाही. पण, फ्रान्सला सुट्टीसाठी गेलं असाताना त्याची भेट झाल्याचं तिनं सांगितलं. त्यांनी हॉटेलमध्ये एकच रुम शेअर केली होती. पुढे ही ओळख आणखी वाढतच गेली. मल्लिका रात्री लवकर झोपते, तिच्या याच सवयीमुळे बॉयफ्रेंडला त्रास होतो असंही तिनं मुलाखतीत स्पष्ट केलं. इतकंच नव्हे, तर तो तिला नन म्हणून चिढवतोसुद्धा.
रिलेशनशिपच्या सुरुवातीच्या काळात कामाच्या व्यापामुळं वेळ कमी मिळत होता. पण, दिवसागणिक हे नातंही परिपक्व झालं, असं म्हणत आता आपण जीवनाच्या अगदी सहज आणि आनंदी वळणावर असल्याचं तिनं सांगितलं.
मल्लिका रुपेरी पडद्यावर बोल्ड अंदाजात दिसत असली तरीही ती प्रत्यक्षात मात्र अतिशय धार्मिक आणि सोज्वळ असल्याचंही म्हणाली.