मुंबई : 'कितने अजीब रिश्ते हैं यहाँ के...' हे गाणं आठवतंय का ? आठवत नसेल, तरीही या गाण्याच्या ओळी कला जगताशी घट्ट नातं असणाऱ्यांसाठी किती समर्पक आहे, हे अनेक उहाहरणं सिद्ध करुन जातात. हसत खेळत दिसणाऱ्या कित्येक सेलिब्रिटींच्या नात्यात आलेलं वादळ एकाएकी सर्वांनाच हादरवून गेलं. नात्यांमध्ये आलेल्या याच वादळांचा तडाखा एका अभिनेत्रीनंही झेलला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

12 जणांसोबत वयाच्या विविध टप्प्यांवर अफेअर असूनही तिला बऱ्याच बाबतीत अपयशाचा सामना करावा लागला. पन्नाशीतही ही अभिनेत्री प्रेमाच्या बाबतीत अपयशीच राहिली. 


प्रेमात मिळालेलं अपयश आणि त्यातून कर्करोगासारख्या आजाराशी सामना करणारी ही अभिनेत्री आहे मनिषा कोईराला. 


सौंदर्याच्या बळावर चाहत्यांना भुरळ घालणारी ही अभिनेत्री 90 च्या दशकात चाहत्यांना अक्षरश: वेड लावत होती. 


'1942- अ लव्हस्टोरी', 'बॉम्बे', 'अकेले हम अकेले तुम', 'दिल से ', 'मन' अशा चित्रपटांतून मनिषा झळकली आणि तिची लोकप्रियता दिवसागणिक वाढत गेली. 


सर्वात पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेता विवेक मुशरन याला तिनं डेट केलं. पण, पुढे हे नातं फार काळ तग धरु शकलं नाही. 


चर्चा तेव्हा वाढली, जेव्हा मनिषाचं नाव अभिनेते नाना पाटेकर यांच्याशी जोडलं गेलं. 'खामोशी' या चित्रपटामध्ये नानांनी तिच्या वडिलांची भूमिका साकारली होती. 


'अग्निसाक्षी' या चित्रपटापासून त्यांच्यातील जवळीक वाढल्याच्या चर्चा झाल्या. पण असं म्हटलं जातं की, यांच्या नात्यात अभिनेत्री आएशा झुल्का हिची एंट्री झाली आणि मनिषाला हादरा बसला. 


पुढे मनिषानं नशेचा आधार घेतला आणि तिची तब्येत खालावत गेली. 2010 मध्ये तिनं नेपाळी व्यावसायिक सम्राट दहल याच्याशी लग्न केलं. पण, या नात्यात झालेल्या मतभेदांमुळं दोघांचं नातं तुटलं. 



माझ्या नशिबात पुरुषाचं प्रेम नाही, असं म्हणणारी ही अभिनेत्री आजही एकटीच आयुष्य जगतेय. पण, आता मात्र तिला सकारात्मकतेची मोलाची साथ मिळतेय.