मुंबई : बॉलीवूड अभिनेत्रींची जीवनशैली रॉयल असते, असं रॉयल आयुष्य कायम ठेवणं अभिनेत्रींसाठी प्रचंड कठीण असतं. अशा परिस्थितीत अभिनेत्री लग्नाचा निर्णय खूप विचार करून घेतात. आज आम्ही तुम्हाला बी टाऊनच्या अशा काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी मोठ्या उद्योगपतींसोबत आणि खूप श्रीमंत व्यक्तींशी लग्न केलं आहे. यातील काही अभिनेत्रींनी तर वयाचा देखीव विचार केला नाही. फक्त कोट्यवधी रुपयांसाठी श्रीमंत व्यक्तींसोबत लग्न केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा



अभिनेत्री राणी मुखर्जीने चित्रपट निर्माता आदित्य चोप्रासोबत लग्न केलं आहे. आदित्य राणीपेक्षा 7 वर्षांनी मोठा आहे. आदित्य चोप्रा हे चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे.


अभिनेत्री जुही चावला आणि जय मेहता



जुही चावला आता आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे. मेहता ग्रुपचे मालक जय मेहता यांच्याशी तिचं लग्न झालं आहे. मेहता यांचा व्यवसाय भारतातंच नाही तर परदेशातही आहे. 


अमृता अरोरा आणि शकील
अमृता अरोराची फिल्मी कारकीर्दही फारशी यशस्वी ठरली नाही. पण तिचं लग्न प्रचंड चर्चेत होतं. रेडस्टोन ग्रुप नावाची कन्स्ट्रक्शन कंपनी असलेल्या बिझनेसमन बॉयफ्रेंड शकीलसोबत अमृता अरोराने लग्न केलं. दोघांना दोन मुले आहेत. अमृता ही शकीलची दुसरी पत्नी आहे.


अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा



या यादीत अभिनेत्री सोनम कपूरचाही समावेश आहे. सोनम कपूरने दिल्लीतील बेस्ट बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले. दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. आनंद आहुजा हे व्यावसायिक जगतात मोठे नाव आहे. सोनम लवकरचं पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.