Neena Gupta VIDEO : `मी तर पब्लिक प्रॉपर्टी...`; फोटो काढला म्हणून इतक्या का भडकल्या नीना गुप्ता?
Neena Gupta Latest Video : चित्रपटांपासून वेब सीरिजपर्यंत आपल्या अभिनयाच्या बळावर लोकप्रियता मिळवणाऱ्या नीना गुप्ता यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. ज्यावरून सध्या बरीच चर्चा सुरु आहे.
Neena Gupta Latest Video : (Bollywood) हिंदी चित्रपट आणि वेब सीरिज विश्वामध्ये आपल्या अभिनयाच्या बळावर लोकप्रिय झालेलं एक नावस, म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ता. वाढत्या वयातही नीना यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला हे पाहून अनेक नवोदित कलाकारांना त्यांचा हेवा वाटतो. रुपेरी पडद्यावर लोकप्रियता मिळवणं असो किंवा मग खासगी आयुष्यात स्थैर्य मिळवणं असो, नीना यांना संघर्ष कुठेही चुकला नाही (Neena Gupta on her private life). किंबहुना त्यांनी आपलं खासगी आयुष्य कधीच गुलदस्त्यात ठेवलं नाही. अशा या नीना गुप्ता त्यांच्या मनमिळाऊ स्वभासाठी आणि तरुण मनासाठी ओळखल्या जातात.
वय वाढत असलं तरीही मनानं चिरतरुण असणाऱ्या या अभिनेत्रीनं कायमच चाहत्यांना घायाळ केलं. फार कमी प्रसंगी असंकाही घडलं ज्यावेळी नीना गुप्ता यांचा अनपेक्षित स्वभाव समोर आला. अशाच एका प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अनेकांच्या नजरा वळवत आहे. त्यांनीच तो स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
नीना गुप्ता यांना अचानकच राग का आला? (Neena Gupta Viral Video)
'पंचायत 2' (Panchayat 2) फेम अभिनेत्री नीना ना गुप्ता यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या मुंबईतील नेहरु सेंटर येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आल्याचं दिसत आहे. इथं त्यांनी फारच ट्रेंडी आऊटफिटला पसंतीही दिली आहे. इथे नीना गुप्ता कार्यक्रमाच्या ठिकाणी वावरत असताना मध्येच एक व्यक्ती त्यांचे फोटो काढून निघून गेला. काही कळायच्या आतच हे सगळं घडलं आणि त्यासुद्धा थबकल्या. 'लोकं न विचारताच फोटो काढतात, मी पब्लिक प्रॉपर्टीच आहे ना... ' असं त्या उपकोधिकपणे म्हणाल्या.
हेसुद्धा वाचा : RajniKanth Home: रजनीकांतही शिवभक्त! घरातील शिवरायांचा फोटो चर्चेत; मुलीची पोस्ट Viral
नीना यांनी तो प्रसंग अतिशय हलक्यात घेतला पण, त्यांच्या या वक्तव्यातून पोहोचायचा तो संदेश अगदी अचूकपणे पोहोचला. सेलिब्रिटी म्हणून वावरत असताना ही मंडळी कुठंही गेली असता त्यांचे असंख्य फोटो निघतात. कुठूनही आणि कसेही.... आणि मग याच फोटोंवरून त्यांना अनेकदा ट्रोलही केलं जातं. थोडक्यात कलाकारांना त्यांचं असं आयुष्य आहे ही बाब हल्लीच्या दिवसांमध्ये आपण सर्वजण विसरतोय का? हाच प्रश्न इथं उपस्थित राहतो.