Corona तून सावरल्यानंतर बदललं नोराचं रंग-रुप; पाहा ओळखणंही कठीण
कोरोनातून सावरल्यानंतर नोरा पुन्हा एकदा तिच्या कामाला लागली आहे.
मुंबई : 'दिलबर गर्ल', डांसिंग सेंसेशन अशी ओळख असणारी सौंद्यवती नोरा फतेही (Nora Fatehi) काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्या कचाट्यात सापडली. ज्यानंतर तिनं रितसर यावरील उचपार घेत अखेर या विषाणूला मात दिली.
कोरोनातून सावरल्यानंतर नोरा पुन्हा एकदा तिच्या कामाला लागली आहे.
हल्लीच तिला मुंबईत एका ठिकाणी पाहिलं गेलं, ज्यानंतर तिचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले.
कोरोनातून सावरल्यानंतर नोरा पुन्हा कामाला लागली खरी. पण, या विषाणूचा तिच्या आरोग्यावर झालेला परिणाम मात्र स्पष्ट दिसत आहे.
एरव्ही अतिशय उत्साहात दिसणाऱ्या नोराच्या चेहऱ्यावर यावेळी थकवा पाहायला मिळाला. फार मेकअप नाही, ट्रेंडी लूक नाही असंच काहीसं तिचं रुप पाहायला मिळालं.
नोराचं हे रुप सर्वांसाठी अनपेक्षित असल्या कारणानं अनेकांना तिला ओळखताही आलं नाही.
माध्यमांच्या प्रतिनिधींनी ज्यावेळी नोराला फोटोसाठी मास्क उतरवण्यास सांगितला तेव्हासुद्धा तिच्या चेहऱ्यावर आजारपण स्पष्ट दिसत होतं.
अगदी सोबर कुर्ता आणि पलाझो अशा कपड्यांना तिनं यावेळी पसंती दिल्याचं पाहायला मिळालं.
कोरोना चाचणीचा नोराचा अहवाल निगेटीव्ह आलेला असला तरीही शरीरात झालेले बदल आणि या विषाणूचा मारा मात्र नोराचं रुप बदलून गेला असं म्हणणं वावगं ठरणार नाही.