मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून मायदेशी परतली आहे. आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये आणि विविध कार्यक्रमांमध्ये ही अभिनेत्री मोठ्या उत्साहात सहभाही होताना दिसत आहे. नुकतीच तिने 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा प्रियांकाच्या येण्याने कपिलचा धमाल विनोदी अंदाज पाहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनोदी फटकेबाजी करणाऱ्या कपिलने कार्यक्रमात रंगत आणली खरी. पण, 'देसी गर्ल'नेच त्याचा एक असा प्रश्न विचारला की, आता कपिल यावर काही उत्तर देणार की नाही याकडेच चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं. 


कपिलनेही 'देसी गर्ल'च्या या प्रश्नाचं त्याच्याच अंदाजात उत्तर दिलं जे पाहून क्या बात कपिल अशीच दाद अनेकांनी दिली असणार यात शंका नाही.


'दोन कोटींचा चेक, की मालदीवमध्ये सहा सुंदर तरुणींसोबत सुट्टीवर जाण्याची संधी, यापैकी तू काय निवडशील?' असा प्रश्न प्रियांकाने कपिलला विचारला. तिच्या या प्रश्नावर सुरुवातीला काहीसे गोंधळलेले भाव त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले. पण, त्यानंतरच त्याने लगेचच आपण २ कोटींचा चेक निवडू असं उत्तर दिलं. बरं आपण हा पर्याय का निवडत आहोत, याचं कारणही त्याने स्पष्ट केलं. पाहा कपिल 'देसी गर्ल' प्रियांकाला नेमकं म्हणाला तरी काय..... 



खुद्द कपिलनेच या खास भागातील एक झलक त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. ही झलक पाहता, हा संपूर्ण भाग पाहण्याची उत्सुकताच प्रेक्षकांना लागून राहिली असणार, हे नाकारता येत नाही.