मुंबई : काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं आणि तिच्या पतीनं सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीचं पालकत्वं स्वीकारलं. ज्यानंतर आता मुलीच्या जन्माला चार महिन्यांहून अधिकचा काळ उलटला असतानाच प्रियांकानं तिच्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. (Priyanka chopra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लेकिचं संगोपन नेमकं कसं करावं आणि कोणत्या गोष्टींना आपल्यापासून दूर लोटावं यासाठी ती प्रयत्न करताना दिसत आहे. 


एका मुलाखतीत नुकतंच तिनं काही मुद्दे स्पष्ट केले. इथं तिनं काही गोष्टी स्पष्टपणे नाकारल्या. आपलं पालकत्वं हे नवखं असल्याचं म्हणत कधीच बाळावर मी आपल्या इच्छा आणि भीती लादणार नाही असं ती म्हणाली. 


आपल्या पालकांनी कधी आपल्या निर्णयांबद्दल पूर्वग्रह न बांधल्याचं म्हणत उलटपक्षी त्यांनी स्वप्न पूर्ण करण्यास मदत केल्याचं प्रियांका म्हणाली. आपणही असंच करु इच्छित असल्याचंही ती म्हणाली. 


मुलं कायम आईवडिलांच्या माध्यमातून त्यांची वाट शोधत आयुष्यात पुढे जात असतात हा मुद्दा अधोरेखित करत प्रियांकानं लेकिच्या संगोपनाबाबतचे विचार सर्वांपुढे ठेवले. 


आतापर्यंत तिनं कधीच तिच्या मुलीचा चेहरा जगासमोर आणलेला नाही. योग्य वेळ येताच प्रियांका तिच्या लेकिची गाठ सर्वांशीच घालून देणार आहे. तूर्तास ती एक उत्तम आई होण्याच्या प्रयत्नांवरच जास्त भर टाकत असल्याचं कळत आहे.