Rasha Thadani On Trolling : बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्रींपैकी एक म्हणून रवीना टंडनला ओळखले जाते. रवीनाने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. रवीना ही 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीना फक्त तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या बेधडकपणे बोलण्यामुळेही चर्चेत असते. सध्या रवीना ही 'पटना शुक्ला' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट डिझ्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. तर दुसरीकडे रवीनाची मुलगी राशा ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.  आता रवीनाची मुलगी राशाने ती ट्रोलिंगचा कसा सामना करते, याबद्दल भाष्य केले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राशा ही सध्या तिच्या पहिल्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. राशा ही अभिनेता अजय देवगणचा भाचा अमन देवगणसोबत सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या दोघांचाही हा पहिलाच चित्रपट असणार आहे. आता नुकतंच राशाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत राशाने ट्रोलिंगबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. यावेळी तिने ती ट्रोलिंगचा कशाप्रकारे सामना करते, याबद्दलही सांगितले. 


"अजून तरी ट्रोलिंगचा सामना केलेला नाही"


"मी सध्या तरी स्वत:ला भाग्यवान समजते की मला अजून तरी ट्रोलिंगचा सामना करावा लागलेला नाही. पण समजा जर तुमचा दिवस हा 100 टक्के असेल आणि काही कारणाने त्या 100 टक्क्यांपैकी फक्त 3 टक्के दिवस खराब झाला. तर उरलेले 97 टक्के दिवस हा खराब होत नाही", असे राशाने यावेळी म्हटले. 


"चांगल्या मानसिक आरोग्यासाठी दररोज ध्यान करते"


"पण जर समजा मला काही कारणांनी ट्रोल केले गेले, तर मला नक्की कशावरुन ट्रोल केलं जात आहे, याचा मी विचार करते. मला याबद्दल वाईटही वाटते. पण मी या सर्व गोष्टी विसरुन पुढे कसं जाता येईल, याचा विचार करते. मी माझ्या चांगल्या मानसिक आरोग्यासाठी दररोज ध्यान करते. जेव्हा तुम्ही फक्त स्वतःसोबत असता, तेव्हा तुम्ही तुमचे विचार आणि भावना समजून घेऊ शकता. यामुळे तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनता येते", असे राशा थडानी म्हणाली. 


राशा थडानी ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशासोबत अमन देवगणही या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अद्याप राशा आणि अमनच्या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. पण गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. राशा ही सोशल मीडियावर सक्रीय असते. ती अनेकदा तिची आई रवीनासोबतचे मजेशीर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.