Ravi Tandon Chowk In Mumbai : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असते. तिने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात एक वेगळं नाव कमावलं आहे. रवीना टंडनचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते रवी टंडन यांचा मुंबई महानगरपालिकेकडून अनोखा सन्मान करण्यात आला आहे. रवीना टंडनने स्वत: याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी ती भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 


मुंबईतील जुहू परिसरातील चौकाचे अनावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवी टंडन यांच्या भारतीय चित्रपट उद्योगातील महत्त्वपूर्ण योगदानाची दखल मुंबई महापालिकेने घेतली आहे. मुंबईतील जुहू परिसरातील एका चौकाला रवी टंडन यांचे नाव देण्यात आले आहे. रवीना टंडनने इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील एका फोटोत मुंबईतील जुहू परिसरातील चौकाजवळ लावलेले फलक दिसत आहे. या फलकावर 'निर्माता श्री रवि टंडन चौक' असे लिहिण्यात आले आहे. यावर 'मुंबई महापालिका' असेही नमूद करण्यात आले आहे. 


याचा एक व्हिडीओही तिने शेअर केला आहे. यात रवीनाची आई विणा आणि रवीना या दोघीही रवी टंडन चौक या बोर्डाचे अनावर करताना दिसत आहेत. या व्हिडीओला तिने हटके कॅप्शन दिलं आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पप्पा. आम्हाला तुमची रोज आठवण येते, असे म्हटले आहे. 



जुहूमधील चौकाला आपल्या वडिलांचे नाव पाहून रवीना खूप भावूक झाल्याचे पाहायला मिळाली. "एक अष्टपैलू, ट्रेंड सेट करणारे चित्रपट निर्माता म्हणून चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान खरोखरच महत्त्वपूर्ण आहे. मुंबईत त्यांचे नाव एका चौकाला दिले जाईल, हे त्यांच्या मेहनत आणि समर्पणाचे प्रतीक आहे. त्यांचे नाव अशा प्रकारे अमर झालेले पाहून माझे हृदय अभिमानाने भरून आले आहे, असे रवीना यावेळी म्हणाली. 



दरम्यान रवीना टंडन वडील रवी टंडन यांचे 11 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले. त्यावेळी ते 86 वर्षांचे होते. रवीनाने तिच्या वडिलांसोबतचे बालपणीचे काही फोटो शेअर करत ही दुख:द बातमी दिली होती. रवी टंडन यांनी 70 आणि 80 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केले. ‘खेल खेल में’, ‘मजबूर’, ‘अनहोनी’, ‘खुद्दार’, ‘जिंदगी’, ‘नजराना’, ‘एक मैं और एक तू’, ‘जवाब’, ‘आन और शान’, ‘निर्माण’, ‘झूठा कहीं का’, ‘चोर हो तो ऐसा’ या चित्रपटांद्वारे सिनेसृष्टीत ठसा उमटवला. त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांच्या दिग्दर्शन कारकिर्दीची सुरूवात केली. तसेच त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती केली. 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह इन शिमला’ या चित्रपटात ते अभिनेता म्हणून देखील झळकले होते.