जैन साधू नग्न का राहतात? वेदना होतात, रक्तही येतं, तरीही 'या' प्रकारे करतात 'केश लोचन'

जैन धर्मात दोन पंथ असून श्वेतांबर आणि दिगंबर. श्वेतांबर संप्रदायातील भिक्षू पांढरे वस्त्र परिधान करतात. तर दिगंबर संप्रदायातील भिक्षू पूर्णपणे विवस्त्र राहतात. यामागील कारण तुम्हाला माहितीय का?

May 18, 2024, 15:56 PM IST
1/7

कुटुंबापासून लांब, सर्व सुखसोयींच्या त्याग करुन जैन साधू खूप कठोर तपश्चर्या करतात. दिगंबर संप्रदायातील भिक्षू अंगावर एकही कपडे घालत नाहीत. यामागील कारणही तेवढंच महत्त्वाच आहे.   

2/7

अशी मान्यता आहे की, जेव्हा भगवान महावीर ध्यानाद्वारे उंच स्तरावर पोहोचले तेव्हा त्यांना शरीराची जाणीव राहिली नाही. त्यांना कपड्याचंही भान उरलं नव्हतं. हा धर्म अहिंसा, अहंता आणि सांसारिक गोष्टींबद्दल पूर्ण त्याग यावर विश्वास ठेवतो.   

3/7

दिगंबरा पंथात वस्त्राचा त्याग हा 'अपरिग्रह' या तत्त्वाचा पराक्रम मानला जातो. जैन धर्मानुसार, कपडे हे भौतिक सुख आहे. कपडे खरेदीसाठी पैसे लागतात. त्या कपड्याची स्वस्छता त्यासाठी लागणारा वेळ या सगळ्या गोष्टी संसारिक जीवनाशी निगडीत आहे. त्यामुळे जैन भिक्षुक कपड्यांचा त्याग करतात.   

4/7

जैन ऋषी हे सर्व परिग्रहांपासून वंचित असल्यामुळे ते त्यांच्याकडे फक्त मोराच्या पिसांनी बनवलेली पेची वापरतात. जी केवळ गुप्तांग झाकण्यासाठी वापरली जाते. काही जैन साधू मोराची पिसे किंवा शेपूटही वापरत नाहीत. 

5/7

एवढंच नाही तर जैन भिक्षू यांची केस कापण्याची प्रक्रियाही देखील कठीण आणि वेदनादायी असते. ते यासाठी कात्री, वस्तरा, ब्लेड इत्यादी कोणत्याही साधनांचा वापर न करत नाही. डोक्याचे, दाढी, मिशा आणि शरीराच्या इतर भागांचे केस ते हाताने उपटतात. 

6/7

दिगंबर जैन यांच्या संत आणि आर्यिकांसाठी (स्त्री साध्वी) केश लंचन अनिवार्य मानल जातं. जैन भिक्षू आणि आर्यनिकांनी वर्षातून चार वेळा केश लोचन करतात. या प्रक्रियेत प्रचंड वेदना ते सहन करतात. कधी कधी केस तोडतानाही रक्त येतं तरीही ते माघार घेत नाहीत. 

7/7

कितीही थंडी असली तरी ते कपड्यांशिवाय राहतात. रजाई किंवा उबदार कपडेदेखील ते वापरत नाही. जमिनीवर झोपतात.