Rekha on Amitabh Bachchan: ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आजही आपल्या सौंदर्य आणि श्रृंगारासाठी ओळखल्या जातात. अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रेखा सध्या चित्रपटांपासून दूर असल्या तरी आजही त्यांचे अनेक चाहते आहेत. सत्तरीत पोहोचलेल्या रेखा आजही तितक्याच सुंदर दिसतात. दरम्यान नुकतीच त्यांनी 'द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2' (The Great Indian Kapil Show) मध्ये हजेरी लावली आहे. नेटफ्लिक्सने या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये कपिल शर्मा आणि रेखा यांच्यात अभिताभ बच्चन यांच्यावरही चर्चा झालेली दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीझरमध्ये दिसत आहे त्यानुसार, कपिल शर्माने यावेळी 'कौन बनेगा करोडपती'चा उल्लेख केला. कपिल शर्माने 'कौन बनेगा करोडपती'मधील आपला अनुभव सांगितला. यावेळी त्याने अमिताभ बच्चन यांची मिमिक्री केली. तो म्हणाला, "आम्ही बच्चन साहेबांसह केबीसी खेळत होतो. माझी आई पहिल्या रांगेत बसली होती. त्यांनी माझ्या आईला विचारलं, देवीजी यांना काय खाऊन जन्माला घातलं आहे?". यावेळी कपिल शर्माच्या आधी रेखा यांनीच लगेच उत्तर दिलं की, 'दाल-रोटी'. त्यावर कपिल म्हणतो, माझ्या आईचंही हेच उत्तर होतं. 


यानंतर रेखा यांनी कपिलला म्हटलं की, "मला विचारा ना, मला प्रत्येक डायलॉग लक्षात आहे". हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांचं म्हणणं आहे की, रेखा यांनी आपण नियमितपणे कौन बनेगा करोडपती पाहत असल्याचं यातून सांगितलं आहे. 



दरम्यान रेखा यांनी यावेळी एक शेरदेखील ऐकवला. "कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहबब्त का भरम रख, तू भी तो कभी मुझे मनाने के लिए आ". कपिल शर्माने यावेळी रेखा यांच्यासह डान्सदेखील केला. रेखा यांनी यावेळी आपण 70 ची नाही तर 17 च्या आहोत असंही उपहासात्मकपणे म्हटलं. 


रेखा पहिल्यांदाच नेटफ्लिक्सवर दिसणार
 


रेखा नेटफ्लिक्सवर दिसण्याची ही पहिलीच वेळ असेल. दरम्यान या एपिसोडमध्ये कीकू शारदा रेखा यांच्यासमोर उमराव जान बनून आला होता. तर दुसरीकडे कृष्णाने शाहरुख खान बनून त्यांना लोटपोट होईपर्यंत हसवलं. रेखा यावेळी सोफ्यावरुन खाली पडून हसत होत्या.