Entertainment News : काही कलाकार त्यांच्या जीवनात इतके पुढे येतात की नव्या पिढीसाठी ते आदर्श ठरतात. तर, काही कलाकारांच्या जीवनात घडलेल्या गोष्टी इतक्या अनपेक्षित असतात की त्यावर विश्वास ठेवणंही कठीणच होऊन जातं. अशाच कलाकारंच्याच यादीत एका अभिनेत्रीचंही नाव येतं. बऱ्याच चित्रपटांमध्ये ही अभिनेत्री झळकली आणि तिनं तिचं वेगळेपण सिद्ध केलं. सालस भूमिका निभावत तिनं प्रत्येकाच्या मनात आणि घरातही स्थान मिळवलं. ही अभिनेत्री कोण, वरील फोटो पाहून ओळखता येतेय का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

7 ऑक्टोबर 1966 मध्ये तिला मुंबईत जन्म झाला. छोटा पडदा म्हणू नका किंवा मोठा पडदा, या अभिनेत्रीनं कायमच तिच्या अभिनयानं अनेकांवर भुरळ पाडली. तिची 'सुरभि' ही मालिका कमालीची गाजली. तर, सलमान खानची (Salman Khan) ऑनस्क्रीन वहिनी म्हणून मुख्य अभिनेत्रीपेक्षाही हीच अभिनेत्री भाव खाऊन गेली. 


ओखळलं का या अभिनेत्रीला.....? अगदी बरोबर. ही आहे रेणुका शहाने. उपलब्ध माहितीनुसार रेणुका अवघ्या 8 वर्षांची असतानाच तिच्या कुटुंबात वादळ आलं. आई- वडिलांच्या नात्यात तणाव निर्माण झाला. सहाजिकच या साऱ्याचा परिणाम तिच्या खासगी आयुष्यावरही झाला. 


हेसुद्धा वाचा : मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे? सिनेमागृहात अवघे पाच प्रेक्षक पाहून चित्रपट सेनेच्या अध्यक्षांकडून खंत व्यक्त


 


एका मुलाखतीत रेणुकानं याबाबतचा खुलासाही केला होता. त्यावेळी परिस्थिती इतकी वाईट होती की, इतर मुलांचे पालक त्यांना रेणुकासोबत खेळण्यासाठीसुद्धा पाठवत नव्हते. एका विभक्त कुटुंबातील मुलगी असल्यामुळं इतरांचा रेणुकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला होता. 'मी त्यांना स्पर्श केला तरी त्यांचं कुटुंब तुटेस', असं वाटायचं या शब्दांत रेणुकानं ती परिस्थिती शब्दांत मांडली होती. समाजाचे टोमणे आणि ही वागणूकही तिनं पचवली. (Renuka Shahane Unknown Facts)


खासगी आयुष्यातील वादळ 


रेणुकाच्या खासगी आयुष्यातही असंच काहीसं घडलं. मराठी रंगभूमीवरील दिग्दर्शक आणि लेखल विजय केंकरे यांच्याशी तिनं लग्न केलं. पण, हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. जीवनात पुन्हा एकदा आव्हानाचा काळ परतला होता. या नात्यातून सावरतानाच रेणुकाच्या जीवनात आशुतोष राणा आले. 


हंसल मेहता यांच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांची भेट झाली होती. रेणुकाला पाहताक्षणी आशुतोष घायाळ झाले होते. त्यांनी मनातील भावनाही व्यक्त केल्या. पुढे ओळख वाढली, भेटीगाठी वाढल्या पण, रेणुकानं मात्र तरीही प्रेम व्यक्त केलंच नव्हतं. अखेर एके दिवशी आशुतोष राणा यांनी ठरवलं आणि प्रेम व्यक्त करून घेण्यासाठी एक शक्कल लढवली. 



फोनवर बोलताना आशुतोष यांनी रेणुकाला एक कविता ऐकवली. कवितेचे शब्द आणि त्यातील भावना इतक्या कमाल करून गेल्या की अखेर रेणुकानं प्रेम व्यक्त केलंच. 2001 मध्ये या नात्याला या दोन्ही कलाकारांनी नवं नाव देत लग्न केलं. सहजीवनाचा त्यांचा प्रवास आजही अतिशय सुखात सुरु असून, त्यांची जोडी अनेकांसाठी आदर्शच आहे.