मुंबई : तनुश्रीने २००८ साली 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटातील गाण्यादरम्यान नाना पाटेकर यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेल्या असभ्य वर्तनाच्या आरोपांचं अभिनेते नाना पाटेकर यांनी खंडन केलं आहे. फरहान अख्तर, कंगना रनौत, सोनम कपूर, ट्विंकल खन्ना आणि रिचा चढ्ढा यांनी तनूश्रीला पाठींबा दिला. यामध्ये आता अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी यामध्ये उडी घेतली.


काय म्हणाल्या रेणुका ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नाना पाटेकर जितकं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ओळखले जातात तितकेच सेटवरील त्यांच्या स्वभावाबद्दलही ओळखले जातात. सिने क्षेत्रातील अनेक स्त्री-पुरूषांना यांच्या रागाचा सामना करावा लागलायं. मी कधी नाना, तनुश्रीसोबत किंवा 'हॉर्न ओके प्लीज' मध्येही काम केलं नाही. तनुश्रीच्या काही मुद्द्यांना मी स्वत:शी जोडू शकते असेही रेणूका यांनी म्हटले. गाण्यातील एका स्टेपमध्ये ती स्वत:ला कम्फर्ट फिल करत नव्हती. नाना पाटेकरांचे विचार काही असले तरी तिला कम्फर्ट वातावरण देणं हे डायरेक्टर किंवा कॉरियोग्राफर यांच काम असल्याचे त्यांनी म्हटलंय. 


काय म्हणाली तनुश्री ? 


‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर जवळपास दहा वर्षांपूर्वी नानांनी आपल्याशी असभ्य वर्त केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. त्याशिवाय त्यावेळी आपल्या पाठिशी कोणीच उभं राहिलं नसल्याचं म्हणत तिने चित्रपटाच्या निर्माते- दिग्दर्शकांवरही निशाणा साधला होता. नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं हे अनेकांनी पाहिलं पण कोणीही माझ्यामागे उभं राहिलं नाही, सगळ्यांनीच केवळ बघ्याची भूमिका निभावली असं ती म्हणाली होती. नाना पाटेकर सेटवर अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करतात, अनेकींना त्यांनी मारहाण केली आहे. कलाविश्वात अनेकांनाच त्यांच्या या स्वभावाची कल्पना आहे, मात्र त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणीच करत नाही असा आरोप तिने केला होता.


नानांनी आरोप नाकारले 


नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताने लावलेले सर्व आरोप नाकारले आहेत. नाना पाटेकरांनी सर्व आरोप फेटाळून जर तिला असं वाटत असेल तर तिने कायद्याने कारवाई करावी. 10 वर्षांनी लावलेल्या आरोपावर नाना म्हणाले की, एक व्यक्तीने अशा पद्धतीने वक्तव्य केल्यावर मी काय बोलणार? लैंगिक अत्याचार म्हणजे काय? एकाचवेळी आमच्यासोबत सेटवर 200 हून अधिक लोकं असायची. त्यामुळे मी देखील कायद्याने काय करता येईल हे बघेन कारण कोणत्याही पद्धतीचा संवाद मला याबाबत करायचा नाही.