मुंबई : संपूर्ण देशात सध्याच्या घडीला लोकसभा निवडणुकांच्या loksabha election 2019 वातावरणाला उधाण आलं आहे. एकिकडे निवडणुकांचे प्रचार म्हणू नका किंवा मग शुद्ध राजकीय पासून ते अगदी अराजकीय मुलाखती म्हणू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही प्रकारे त्यांच्या परिने प्रचारात कोणतीच उणिव राहू देत नाही आहेत. पण, या साऱ्याला वेगळं वळण मिळालं, जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या 'टाईम' या मासिकाने मोदींचा उल्लेख India`s divider in chief असा केला. सर्वत्र 'टाईम'च्या या मुखपृष्ठाची चर्चा झाली. अनेकांनीच यावर प्रतिक्रियाही दिल्या. ज्यामध्ये कलाविश्वही मागे राहिलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परखडपणे आपती मतं मांडण्यासाठी आणि ठाम भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री स्वरा भास्कर हिने एक ट्विट करत थेट पंतप्रधानांनाच टोला लगावला. 'टाईम' मासिकाचंच मुखपृष्ठाचा फोटो असणारं ट्विट शेअर करत तिने हे ट्विट केलं. ज्यामध्ये एक बोचरं विधान तिने लिहिलं. मोदींचा 'दुफळी निर्माण करणारा नेता' म्हणून उल्लेख असणारा फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, 'जेव्हा तुम्ही परदेशी माध्यमांना विकत घेऊ शकत नाही....'



रिचाने केलेलं हे ट्विट पाहता, तिच्यावर मोदी समर्थकांचा रोष ओढावला जाणार ही बाब अपेक्षित होती. किंबहुना तसं झालंही. तिच्या या ट्विटला उत्तर देत अनेकांनीच टाईम मासिक आणि रिचाची भूमिका या दोन्ही गोष्टींवर निशाणा साधला. कोणी, फक्त मुखपृष्ठावरुनच गोष्टीविषयी अंदाज न बांधण्याचा सल्लाही तिला दिला.


‘टाइम’ मासिकाच्या आशिया आवृत्तीत भारतातील लोकसभा निवडणूक २०१९ आणि मागील पाच वर्षांत पंतप्रधान पदावर असणाऱ्या मोदींच्या कामकाजा प्रकाशझोत टाकण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. आतीश तासीर यांनी हा मुख्य लेख लिहिला आहे. ज्यामध्ये मोदी हिंदुत्वावर आधारित राजकारण करत असण्याविषयीचा आरोपही करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. याच धर्तीवर करण्यात आलेल्या रिचाच्या एका ट्विटने अनेक विषयांना खरंतर एका नव्या वादाला वाचा फोडली. आता समर्थकांचे प्रश्न आणि त्यांचे टोले पाहता यावर रिचा कशी व्यक्त होते हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.