`हे` ऐकून अभिनेत्यांना त्यांच्या बायका सारापासून दूर ठेवतील, कारण...
साराशीच निगडीत एक धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे.
मुंबई : अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या तिच्या आगामी 'अतरंगी रे' चित्रपटामुळं चर्चेत आली आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र असणारी सैफ अली खान याची ही लेक दर वेळी नव्या लूकमध्ये सर्वांच्या समोर येत आहे.
एकिकडे सारा तिच्या कारकिर्दीत नव्यानं उंची गाठत असतानाच आता साराशीच निगडीत एक धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे.
आता म्हणे साराला विवाहित पुरुषांचा नाद लागला आहे.
आता तुम्ही म्हणाल ही काय नवी भानगड? तर, सोशल मीडियावरचा व्हिडीओ पाहून तुम्हाला याचा अंदाज येईलच.
'कॉफी विथ करन' या चॅट शोची एक क्लिप सध्या व्हायरल होत आहे. जिथं करणनं साराला एक प्रश्न विचारला होता.
अशा चार लोकांची नावं सांग ज्यांना तू स्वयंवराला बोलवू इच्छितेस...
करणच्या या प्रश्नावर सारानं रणवीर सिंग, विजय देवरकोंडा, विकी कौशल आणि वरुण धवन यांची नावं घेतली.
तिनं नाव घेततेल्या अभिनेत्यांपैकी विजय वगळता इतरांची लग्न झालेली आहेत. पण, तरीही त्यांच्यात साराला नेमकं काय भावलं हा मोठाच प्रश्न.
साराचं हे उत्तर ऐकून करणही तिला म्हणतो, मी आशा करतो की यांच्या पत्नी हा एपिसोड पाहत असतील.
करणचीच फिरकी घेत सारा पुन्हा म्हणाली, मी आशा करते की त्यांचे पती हा एपिसोड पाहत असतील. साराची ही फिरकी पाहून तिथं असणारा अभिनेता धनुषसुद्धा जोरात हसू लागला.