लग्नानंतर शिबानी एकाएकी करु लागली विचित्र कामं, पाहून फरहानही हादरेल
त्यांचा सहजीवनाचा हा प्रवास अनेकांना हेवा वाटेल असाच. पण, आता....
मुंबई : अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) याच्याशी लग्न केल्यानंतर शिबानी दांडेकर हिच्या आयुष्यात बऱ्या गोष्टी बदलल्या. मुळात समाजानं आखलेल्या रुढींना शह देत फरहान आणि शिबानीनं लग्नगाठी बांधल्या. त्यांचा सहजीवनाचा हा प्रवास अनेकांना हेवा वाटेल असाच. पण, आता शिबानीनं सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल यांचं सगळं ठीक चाललंय ना?
शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) हिनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जिथं ती मेकअप करतानाच विचित्र पद्धतीनं डान्स स्टेप करताना दिसत आहे.
शिबानी आणि तिच्यासोबत असणारे मेकअप आर्टिस्टही तिच्याचप्रमाणे डा डान्स करताना दिसत आहेत. चेहऱ्यावर शून्य भाव आणि त्याच हा डान्स, नेमकं प्रकरण आहे तरी काय याचाच अंदाज नेटकऱ्यांना लावता येईना.
मला ठाऊक नाही, आम्ही इथे नेमकं काय करत आहोत. मला इतकंच ठाऊक आहे की हे सर्व करताना मला मजा आली... या माणसांवर माझं खूप प्रेम आहे....; असं तिनं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.
आता फरहानला पत्नीला अचानक सुचलेल्या या डान्सची काही कल्पना आहे का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. मुळात त्याला तिचं नेमकं काय सुरुये हे ठाऊक नसल्यास हा त्याच्यासाठी एक हादराच असेल असं म्हणायला हरकत नाही.