मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती, राज कुंद्रा याचं नाव काही दिवसांपूर्वी अश्लील व्हिडीओ प्रकरणामध्ये गोवलं गेलं. शिल्पासाठी हा दरम्यानचा काळ अतिशय आव्हानात्मक होता. पती कारागृहात असतानाही शिल्पानं मोठ्या धीरानं परिस्थितीचा सामना केला. या साऱ्यामध्ये तिच्या वैवाहिक नात्याबाबतप्रश्नही उपस्थित करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिल्पा आणि राज त्यांच्या वैवाहिक नात्यातून विभक्त होण्याचा निर्णय़ घेणार, इथवरही चर्चांनी जोर धरला. (Shilpa shetty Raj kundra)


अखेर, खुद्द शिल्पानंच तिच्या लग्नाच्याच वाढदिवसाच्या दिवशी सर्व गोष्टी अधिक स्पष्टपणे मांडल्या. 


जवळपास 12 वर्षांपूर्वी शिल्पा आणि राज विवाहबंधनात अडकले होते. त्या क्षणांचे काही फोटो तिनं शेअर केले. 


फोटो शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'या क्षणी आणि या दिवशी 12 वर्षांपूर्वी आपण एक वचन केलं. बरं-वाईट, कठीण प्रसंग या साऱ्याच प्रेम आणि देवावर विश्वास ठेवण्याचं. एकमेकांची साथ देण्याचं ते वचन. 


12 वर्षे झाली त्या गोष्टीला आज. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, कुक्की...', असं तिने लिहिलं.


आपल्या सर्व हितचिंतकांचे तिनं यावेळी आभार मानले. शिल्पाचे हे फोटो तिच्या आणि राजच्या नात्याचा पाया किती भक्कम आहे हे सांगून गेलं. 


शिवाय यानिमित्तानं शिल्पानं तिच्या आणि राजच्या घटस्फोटाच्या चर्चांना कायमस्वरुपी पूर्णविराम दिला.