मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या चित्रपट आणि नृत्यकौशल्यासोबतच आणखी एका कारणासाठीही ओळखली जाते. हे कारण म्हणजे शिल्पाचा फिटनेस. चीट डे वगळला, तर आठवड्यातील इतर दिवशी ही अभिनेत्री तिच्या फिटनेसची काळजी घेताना दिसते. (Shilpa shetty Video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योगसाधनेपासून जीममध्ये मेहनत घेण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत ती कायमच अग्रेसर असल्याचं पाहायला मिळतं. पण, आता मात्र तिची हीच सवय तिला अडचणीत आणत असल्याचं कळत आहे. 


सोशल मीडियावर सध्या शिल्पाचा एक व्हिडीओ सर्वांना विचारात पाडत आहे, चाहत्यांना चिंतेत टाकत आहे. 


कारण, इशं शिल्पा जमिनीवर कोसळलेली दिसत आहे. तिच्यासोबत नेमकं काय घडलं की ती जमिनीवरच कोसळली, असा प्रश्नही चाहते विचारताना दिसत आहेत. 


खुद्द शिल्पानेच चाहत्यांच्या या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. आठवड्याची सुरुवात आणि वर्षातील पहिल्या महिन्याचा शेवट शिल्पाचा अंत पाहून गेला असं म्हणायला हरकत नाही. 


व्यायाम करून थकल्यामुळे ती जीममध्ये जमिनीवरच कोसळली, पण स्वत:वरील प्रेमाखातर तिनं मोठ्या जिद्दीनं पुन्हा एकदा व्यायामाची तयारी दाखवली. 



सहसा जीममध्ये किंवा घरात कुठेही आपल्या मर्यादेपेक्षा अधिक व्यायाम केल्यानंतर आपली जी अवस्था होते तिच शिल्पाचीही झाली. 


फरक इतकाच होता की आपल्यातले अनेकजण थकवा येतो म्हणून लगेचच व्यायाम करणं बंद करतो. पण, शिल्पानं मात्र तसं केलेलं नाही.


काय मग कशी वाटली ही जिद्दी शिल्पा?