मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती, आनंद अहूजा या दोघांनीही मिळून लंडनमध्ये एक आलिशान घर खरेदी केलं. या घराला आपल्या प्राधान्यानुसार सजवत त्यांनी अनोखा साजही दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरातून कानाकोपऱ्यातून कलेचे नमुने गोळा करत त्यांची सुरेख सांगड घालत सोनमनं तिच्या घरासाठी अप्रतिम अशा वस्तू तयार करुन घेतल्या आहेत. घरातील भींतींवर असणाख्या लँपपासून ते अगदी सोफा आणि डायनिंग टेबलपर्यंत, प्रत्येक गोष्टीत सोनमनं एक खास टच दिल्याचं पाहायला मिळत आहे. 


काही दिवसांपूर्वीच तिनं या घराते फोटो सर्वांच्या भेटीला आणले. ज्यानंतर आता तिनं याच आलिशान घराचा एक व्हिडीओही सर्वांच्याच भेटीला आणला आहे. 


कोट्यवधींचा खर्च करुन सोनमनं हे घर सजवलं खरं, पण या घरात तिच्या सर्वात आवडीची जागा किंवा वस्तू विचारलं असता ती लगेचच उत्तर देते, पावडर बाथरुन आणि तिथं असणारा टोटो पॉट. 


टोटो पॉट मला फार आवडतात. मला ठाऊक आहे ही कोणतीही डिझाईनची गोष्ट नाही. पण, माणसानं तयार केलेल्या अदभूत गोष्टींपैकी एक म्हणजे हा टोटो पॉट.'



सोनमला आता हा टोटो पॉटच इतका का आवडतो, याबाबतचा खुलासा हा व्हिडीओ पाहूनच होत आहे. दरम्यान घराच्या सजावटीसाठी ठराविक गोष्टींबाबत सोनम आग्रही असल्याचं तिच्या या व्हिडीओतून पाहता येत आहे.