मुंबई :  एकिकडे २०१८ हे वर्ष संपूर्ण कलाविश्वासाठी खऱ्या अर्थाने लग्नसराईचं वर्ष ठरलं तर, दुसरीकडे काही सेलिब्रिटींनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या खास पर्वाची माहिती देत सर्वांनाच थक्क केलं. अशाच चेहऱ्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेत्री सुष्मिता सेन. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही महिन्यांपूर्वीच सुष्मिताने रॉमन शॉल या मॉडेलसोबतच्या तिच्या रिलेशनशिपची माहिती सर्वांनाच दिली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ती आणि रॉमन नेहमीच त्यांच्या नात्याची ग्वाही देत असतात. त्यात आणखी एका सुरेख अशा पोस्टची भर पडली आहे. 


सुष्मिताच्या वाढदिवसाच्या दिवशी ज्याप्रमाणे रॉमनने तिच्यासाठी एक पोस्ट लिहिली होती, त्याचप्रमाणे आता रॉमनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुष्मिताने त्याला शुभेच्छा देत एक शुभेच्छापर पोस्ट लिहिली आहे. 'तुझ्या असण्याने आयुष्य म्हणजे जणू एक कविताच आहे', असं लिहीत 'WE' for Victory म्हणत रॉमनसोबतच्या नात्याला अधोरेखित केल्याचं पाहायला मिळालं. शिवाय तिने रॉमनचा उल्लेख 'रूह' असाही केला. रुह म्हणजेच आत्मा. रॉमन हा आपला आत्मा असल्याचं म्हणत त्याच्या आयुष्यातील एका खास दिवसाला सुष्मिताने खऱ्या अर्थाने आणखी खास केलं, असं म्हणायला हरकत नाही. 




नात्यात विश्वात जितका महत्त्वाचा आहे योग, व्यायाम या गोष्टींनाही तितकच प्राधान्य देणाऱ्या सुष्मिताने रॉमनसोबतचा व्यायाम करतानाचाही व्हिडिओ पोस्ट केला आहे. हे अनोखे 'कपल गोल्स' देणाऱ्या सुष्मिताचे तिच्या प्रियकरानेही आभार मानले आहेत. त्यांचं हे नातं पाहता चाहत्यांनीही कमेंट बॉक्समध्ये या जोडीला भावी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.