मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन हिने काही दिवसांपूर्वीच तिचा वाढदिवस साजरा केला. दुबई येथे तिने आपल्या मुलींसोबत हा खास दिवस व्यतीत केला. एकिकडे सुष्मिता आपल्या मुलींसोबत वेळ व्यतीत करत असतानाच तिच्या तथाकथित प्रियकराने म्हणजे मॉडेल रॉमन शॉल याने तिच्यासाठी एक सुरेख अशी पोस्ट लिहितच या दिवसाच्या शुभेच्छा तिला दिल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुष्मितासोबतचा फोटो त्याने पहिल्यांदाच पोस्ट केला. मुख्य म्हणजे त्याने लिहिलेल्या कॅप्शनमधूवन त्याचा आनंद व्यक्त होत होता. रॉमनच्या या शुभेच्छांचा स्वीकार करत खुद्द सुष्मिताने अत्यंत सुरेख अशा अंदाजात त्याचा हा फोटो आणि पूर्ण पोस्ट रिपोस्ट केली. 


'आज कोणाचा वाढदिवस आहे पाहा..... वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा जान', असं लिहित त्याने आपल्या आयुष्यातील अत्यंत खास व्यक्तीला म्हणजेच सुष्मिताला शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या काळात तिच्यावर आनंदाचा वर्षाव होवो, असं लिहित त्याने सुष्मिताला शुभेच्छा दिल्या होत्या. 


सुष आणि रॉमनच्या नात्यात आलेलं हे वळण पाहता आता खरंच त्यांच्या रिलेशनशिपविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नसल्याचं स्पष्ट होत आहे. 



रॉमन हा मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय असून, सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीच्या ब्रँडसाठी मॉडेलिंग केल्यानंतर तो प्रकाशझोतात आला होता. त्याशिवाय आता सुष्मितासोबतच्या नात्यामुळेही तो बराच चर्चेत आला आहे.