मुंबई : चित्रपटांतील भूमिका असो किंवा मग एखादा चर्चेत असणारा महत्त्वाचा विषय. प्रत्येक मुद्द्यावर कलाविश्वातील  काही चेहरे असे असतात ज्यांच्या वक्तव्याकडे अनेकांच्याच नजरा लागून राहिलेल्या असतात. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेत्री स्वरा भास्कर. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वच कालाकार मंडळी #MeToo या चळवळीबद्दल आपली मतं ठामपणे मांडत असताना आतापर्यंत स्वरा याविषयी मौन पाळून का, असा प्रश्न अनेकांनाच पडत होता.


अखेर स्वराने या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


लैंगिक शोषणातच्या आरोपावर आपण यापूर्वीही अनेकदा बोललो आहोत, ही बाब लक्षात आणून देत याविषयी ट्विटही केल्याचं तिने लक्षात आणून दिलं. 


भारतात #MeToo ही मोहिम काहीशी उशिराने सुरु झाली. पण, तरीही सध्याच्या घडीला ज्या महिला आपल्यावर झालेल्या अत्याचारांविषयी वक्तव्य करत आहेत हे सारंकाही दाद देण्याजोगं असल्याचंही तिने सांगितलं. 


महिला अत्याचारांविषयी जे काही सांगत आहेत, ते गांभीर्याने ऐकण्याची गरज असून ही बाब फक्त बॉलिवूडपुरताच लागू होत नसून सर्वच स्तरांसाठी मी हे सांगत असल्याचं, ती म्हणाली. 


स्वराची ही भूमिका पाहता या मह्त्वाच्या मुद्द्यावर ती शांत का, असा प्रश्न यापुढे उपस्थित केला जाणार नाही, हे खरं. 


दरम्यान, अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने एका मुलाखतीत अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ज्यानंतर हे #MeToo चं वादळ सर्वत्र पाहायला मिळालं. तेव्हा आता येत्या काळात या महत्त्वाच्या प्रकरणाला कोणतं वळण मिळणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.