मुंबई : अभिनेत्री आणि त्यांचा हटके स्टाईल स्टेटमेंट बद्दल काय बोलावं. कधी टॉपलेस, कधी ब्रालेस, कधी टोन्ड एक ना अनेक ट्रेंड दर दिवसाआड या अभिनेत्री फॉलो करत असतात. अनेकिंना यामध्ये स्टाईल किंवा अमूक एक लूक कॅरी करण्यासाठी प्रेक्षकांकडून शाबासकी मिळते. तर यातील काहीजणी मात्र नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या एक अभिनेत्री तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळेच चर्चेचा विषय ठरत आहे. इतकंच नव्हे, तर तिनं पुढे जे केलंय ते पाहून सर्वजण हैराण आहेत. 


ही अभिनेत्री आहे वाणी कपूर. वाणीनं नुकताच तिचा बिकीनी लूक फ्लॉन्ट केला होता. तिच्या या लूकला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता त्यातच एक थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे. 


बिकीनीमध्येच वाणी थेट सलूनमध्ये पोहोचल्याचं य़ा व्हिडीओमध्ये दिसत आहे. इथे तिची हेअरस्टायलिंग सुरु असल्याचंही पाहायला मिळत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Filmfare (@filmfare)


वाणीचा हा व्हिडीओ पाहून, ही काय स्टाईल? हे अती झालं... शोभत नाही ती स्टाईल कराच कशाला, अशा बऱ्याच कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


आता मुद्दा असा की, इतर सर्व अभिनेत्रींप्रमाणे वाणीही या ट्रोलर्सच्या टीकांकडे दुर्लक्ष करणार की त्यांना उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.