Vicky kaushal responds to Katrina pregnancy Rumors : विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा लंडनमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे कतरिना प्रेग्नेंट (Katrina Kaif Pregnancy) असल्याची चर्चा सुरू झाली होती. अशातच आता विकी कौशलने (Vicky Kaushal) यावर स्पष्टीकरण दिलं आहे. लंडनमधील व्हिडीओमध्ये कतरिनाचा बेबी बंप दिसल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे बॉलिवूडचे हे क्युट कपल गुड न्यूज देणार का? असा सवाल विचारला जात होता. अशातच दिल्लीतीरल बॅड न्यूज या विकीच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कतरिनाच्या प्रेग्नंसीविषयी विकीने खुलासा केला.


काय म्हणाला Vicky kaushal ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिनाच्या प्रश्नावर विकी पहिल्यांदा हसला. गुड न्यूज बद्दल बोलायचं झाल्यास, अशी गुड न्यूज शेअर करण्यात आम्हालाच जास्त आनंद होईल. पण सध्या होत असलेल्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाहीये. सध्या तुम्ही आमचा बॅड न्यूज एन्जॉय करा, आम्ही गुड न्यूज असली की तुम्हाला नक्की कळवू, असं म्हणत विकीने प्रश्नावर फुलस्टॉप दिलाय.


कतरिना उद्या म्हणजेच 16 जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्यावर देखील विकीने भाष्य केलं. आमच्यासाठी तो दिवस नक्कीच खास आहे. मी तिच्यासोबत वाढदिवस साजरा करेल, आम्हाला एकत्र वेळ घालवायचा आहे, गेल्या काही दिवसांपासून मी माझ्या कामात व्यस्थ आहे आणि ती देखील प्रवास करतीये. त्यामुळे आम्हाला एकत्र वेळच मिळत नाही, असं खंत देखील विकी कौशलने यावेळी बोलून दाखवली.



दरम्यान, कतरिना कैफचा जन्म 16 जुलै 1983 ला हाँगकाँगमध्ये झाला पण तशी ती मूळची लंडनची आहे. तिचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी आहेत, तर आई सुझान टारकोट मूळची ब्रिटिश आहे. कतरिना कधीच शाळेत गेली नाही. तिची आई एक सामाजिक कार्यकर्ती असल्याने ती वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायची. त्यामुळे कतरिना एकूण 18 देशांमध्ये राहिली. बॉलिवूडमध्ये नशिब कमावत असताना अचानक कतरिनाचा आयुष्यात विकी कौशलची एन्ट्री झाली अन् कतरिनाच्या आयुष्याला वळण आलं.