मुंबई : पूर्वीच्या काळात महिलेनं बाळासाठी फार वेळ लावू नये असंच म्हटलं जायचं. किंबहुना ती तेव्हाच्या समाजाची ही धारणा होती. पण, जसा काळ बदलला तसतशा या सर्व समजुतीही बदलल्या. करिअर आणि घर अशा दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखण्याला महिला प्राधान्य देताना दिसल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमध्येही असं चित्र दिसलं, जिथे बऱ्याच अभिनेत्रींनी कुटुंबाला महत्त्वं दिलं, तर कुणी करिअर आणि कुटुंबाचा समतोल राखत मातृत्त्वं स्वीकारलं. बी टाऊनमध्ये अशाच काही सेलिब्रिटी फार कमी वयातच आई झाल्या.... (Bollywood Actress who became mother at young age neetu kapoor meera rajput kapoor )


नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्याशी 1980 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर त्या बरीच वर्षे चित्रपटांमध्येही झळकल्या नाहीत. वयाच्या 22 व्या वर्षीच नीतू यांनी रिद्धीमाला जन्म दिला. 



अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी वयाच्या 16 व्या वर्षी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर लगेचच त्या गरोदर राहिल्या आणि 17 व्या वर्षी ट्विंकलला जन्म दिला. 



मीरा राजपूत हिनं 2015 मध्ये अभिनेता शाहिद कपूर याच्याशी लग्न केलं. तेव्हा ती अवघ्या 20 वर्षांची होती. मीरानं 22 व्या वर्षी पहिल्या बाळाला जन्म दिला, तर त्यानंतर तिनं पुन्हा एकदा मातृत्त्वाची जबाबदारी स्वीकारली. 



सलमानसोबत बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या अभिनेत्री भाग्यश्री हिनं फार चित्रपट केले नाहीत. पण, ती चर्चेत मात्र कायमच राहिली. 19 व्या वर्षी तिनं व्यावसायिक हिमालय दासानी याच्याशी लग्न केलं आणि 22 व्या वर्षी तिनं बाळाला जन्म दिला. 



महाराष्ट्राची फेव्हरेट जोडी असणाऱ्या रितेश देशमुख आणि जिनिलीया यांच्या नात्यातही बच्चेकंपनीचा किलबिलाट लवकरच झाला. जिनिलियानं 27 व्या वर्षी पहिल्या मुलाला जन्म दिला.