मुंबई : फॅशन शोबाबत कायमच अनेकांना कुतूहल वाटतं. ज्या आत्मविश्वासानं मॉडेल म्हणा किंवा अभिनत्री म्हणा रॅम्पवर येतात ते कौतुकास्पदच आहे. अशातच प्रत्येत वेळी हा 'फॅशनबाज' रॅम्प त्यावर येणाऱ्यांना चांगले अनुभव देतोच असं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री कंगना राणौत, यामी गौतम या अभिनेत्रींना हे चांगले नसणारे अनुभव एकदा आलेच असावेत. कारण, चारचौघात, भर रॅम्पवरच या अभिनेत्रींना नको त्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं. 


2014 मध्ये कंगनानं इंडिया फॅशन वीकच्या ग्रँड फिनालेमध्ये भाग घेतला होता. फॅशन डिझायनर नम्रता जोशीपुरासाठी ती शो स्टॉपर होती. पण, तेव्हाच अचानक तिचा तोल गेला आणि बस्स.... मग काय चर्चांना उधाण आलं. 



80 च्या दशकात आपल्या सौंदर्यानं सर्वांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री पुनम ढिल्लों यांच्यासोबतही असाच प्रसंग घडला होता. विक्रम फडणवीलसाठीच्या एका फॅशन शोमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. 


त्या रॅम्पवर आल्या आणि अडखळल्यामुळे तिथेच पडल्या. साडीमध्ये चप्पल अडकल्यामुळे त्यांना या प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. 



2010 मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ब्लेंडर्स प्राईड बंगळुरूमध्ये झालेल्या एका फॅशन शोमध्ये शो स्टॉपर होती. पण, तिथे गाऊनमध्ये अडकल्यामुळे तिचा तोल गेला होता. 



रॅम्पवर पडणाऱ्यांमध्ये गायिका सोना मोहापात्रा हिच्याही नावाचा समावेश आहे. 2013 मध्ये ती जेव्हा लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवर आली तेव्हा फारच जोरात तिथे पडली. 



अभिनेत्री यामी गौतम हिच्यासोबत 2018 मध्ये असा प्रसंग घडला जो ती आठवूही इच्छित नाही. रॅम्प वॉक करताना तिचा तोल गेला आणि तिनं कसंबसं स्वत:ला सावरलं. 



फॅशन वगैरे सकर्वकाही ठीक, पण ज्यावेळी या अशा गोष्टी घडतात, तेव्हा मात्र बऱ्याच चर्चा होतात हे खरं.