मुंबई : दिल्लीतील मुलांची जादू अशी काही चालली की बॉलिवूडच्या स्टार्स चक्क दिल्लीच्या सूना झाल्या. दिल्लीच्या सूना या यादीत आता सोनम कपूरचाही समावेश झाला आहे. सोनम कपूर शिवाय अजूनही काही बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांनी दिल्लीची सून होण्यास पसंती दिली. पाहुया कोण आहेत त्या...


सोनम कपूर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

८ मे ला दिल्लीच्या करोडपती बिजनेसमॅन आनंद आहुजासोबत विवाहबद्ध होत सोनम दिल्लीची सून झाली. २०१४ मध्ये पेरनिया कुरेशी यांनी सोनम आणि आनंदची ओळख करुन दिली. त्यानंतर मैत्री, प्रेम आणि विवाह असा प्रवास घडला.



अनुष्का शर्मा


भारताच्या क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली हा दिल्लीचाच. खूप काळापासून एकमेकांना डेट करणाऱ्या विरुष्काने ११ डिसेंबर २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली आणि दिल्लीची सून झाली. 



मीरा कपूर


बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरची पत्नी मीरा कपूर ही दिल्लीची मुलगी आणि सून आहे. शाहीद कपूर आणि मीरा कपूर दोघेही दिल्लीच असून मीरा शाहीदपेक्षा १४ वर्षांनी लहान आहे. ७ जुलै २०१५ मध्ये दोघे विवाहबद्ध झाले.



दिया मिर्जा


८ ऑक्टोबर २०१४ मध्ये दिया मिर्जा दिल्लीतील सलिल सांघा याच्याशी विवाह केला आणि दिल्लीची सून झाली. सलिल एक फिल्ममेकर आहे. २००९ पासून एकमेकांना डेट करत असलेल्या या दोघांनी २०१४ मध्ये विवाहगाठ बांधली.



असिन


राहुल शर्माशी लग्न करुन असिन दिल्लीची सून झाली. अक्षय कुमारच्या मदतीने दोघे भेटले. त्यानंतर असिन आणि राहुलने २० जानेवारी २०१६ मध्ये विवाह केला. राहुल शर्मा मायक्रोमॅक्स कंपनीचा को-फाऊंडर आणि एमडी आहे.