मुंबई : अमुक एका सेलिब्रिटीची त्वचा मला आवडते. तमुक एकाच्या चेहऱ्याची चमक मला आवडते, असं म्हणणारे आपल्यापैकीच कित्येक आहेत. मुळात सेलिब्रिटींच्या राहणीमानाचा, त्यांच्या जीवनशैलीचा आपल्याला कायमच हेवा वाटत असतो. पण, याच सेलिब्रिटींच्या आयुष्यातील काही अडचणी समोर येतात तेव्हा.....? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेव्हा मात्र आपण पेचात पडलेलो असतो. अभिनेत्री यामी गौतम हिच्याबाबतही असंच घडलंय. 


यामीचा स्मितहास्य असणारा चेहरा असंख्य चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतो. पण, तुम्हाला ठाऊक आहे का, याच यामीनं बऱ्याच अडचणींचाही सामना केला आहे. 


सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातींमध्ये झळकणारी, सौंदर्यवती यामी 'केराटोसिस पिलारिस' (Keratosis Pilaris) या आजाराशी झुंजतेय. 


सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अनएडिटेड फोटो शेअर करत यामीनं या आजाराचा खुलासा केला होता. 


ऐन तारुण्यापासून तिला या आजाराची सुरुवात झाली. ज्यावर कोणताही उपाय अद्याप सापडलेला नाही. परिणामी तिला आयुष्यभरासाठी याचा सामना करावा लागू शकतो. 


पोस्ट लिहिल्यानंतर यामीनं आता एका कार्यक्रमातही आपल्या या आजावर वक्तव्य केलं आहे. 


एरव्ही चित्रीकरणासाठी गेल्यानंतर चेहऱ्यावर या आजारपणामुळं दिसणार परिणाम कसे लपवता येतील याची चर्चा व्हायची. मुळात या आजाराचा स्वीकार करण्यासाठी कैक वर्षांचा लाळ लोटला. 


परिस्थिती हळुहळू बदलत गेली ही बाबा आता यामी स्वीकारत आहे.



काय आहेत या आजाराची लक्षणं? 
त्वचेवर बारीक, दाणेदार पुरळ येणं, त्वचेचा काही भाग रुक्ष दिसणं. पुरळांमुळे जांघ आणि गालांवर वेदना होणं ही या आजाराची काही लक्षणं आहेत.