90 च्या दशकातील नायिका एकाच वेळी एकाच ठिकाणी त्याच्यासोबत काय करतायत? Photo Viral
नुकतीच मनीष मल्होत्राच्या (Manish Malhotra Diwali Party) घरी एक ग्रँड दिवाळी पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व स्टार्स पोहोचले होते. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan), काजोल (Kajol), रवीना टंडन (Ravina Tandon), अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक स्टार्सने हजेरी लावली. या पार्टीत कलाकारांनी खूप धमाल केली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Bollywood actresses Diwali: बॉलीवूडची दिवाळी आता सुरू झाली तेव्हा अनेक सेलिब्रेटींनी पार्ट्यांना हजेरी लावायला सुरूवात केली आहे. अनेक बॉलीवूडच्या सेलिब्रेटी कपल्सनीही त्यांच्या घरी दिवाळी सेलिब्रेशन सुरू केलं आहे आपल्या घरी सेलिब्रेशन पार्टी सुरू केली आहे. अनेक सेलिब्रेटी दिवाळी पार्टीच्या इथे स्पॉट होत आहेत. नुकत्याच एका व्हायरल फोटोनं सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. (bollywood actresses with with manish malhotra at a diwali party celebration madhuri dixit kajol aishwarya rai bachchan)
नुकतीच मनीष मल्होत्राच्या (Manish Malhotra Diwali Party) घरी एक ग्रँड दिवाळी पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व स्टार्स पोहोचले होते. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan), काजोल (Kajol), रवीना टंडन (Ravina Tandon), अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक स्टार्सने हजेरी लावली. या पार्टीत कलाकारांनी खूप धमाल केली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे
काजोल आणि माधुरीनेही (Kajol and Madhuri Dance) एकत्र डान्स केला, ज्याचा व्हिडिओ काजोलने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याने व्हिडिओला कॅप्शन दिले, "ओरजिनल डान्सिंग क्वीनसह. मी खूप एन्जॉय केलं. धन्यवाद माधुरी. आणि हे शक्य केल्याबद्दल मनीष मल्होत्राचे आभार. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा."
जान्हवी कपूर, खुशी कपूर, सुहाना खान, करण जोहर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, क्रिती सेनॉन, वरुण धवन, नोरा फतेही, अनन्या पांडे, सारा अली खान, विकी कौशल, कतरिना कैफ यांनीही या पार्टीला हजेरी लावली. पार्टी होस्ट मनीष मल्होत्रा ब्लॅक जॅकेट आणि पॅंटसह निळ्या कुर्त्यामध्ये दिसत होता.
आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'
अशी रंगली सेलिब्रेटी फॅशन... (Celebrity Diwali Fashion)
नेहमीप्रमाणे यावेळीही ऐश्वर्या राय देसी लूकमध्ये दिसली. तिने फिकट गुलाबी रंगाचा सूट घातला होता आणि अभिषेक तिच्यासोबत लाल एम्ब्रॉयडरी कुर्ता पायजमामध्ये दिसत होता. रवीना टंडनने गडद हिरव्या रंगाचा सूट परिधान केला होता. ऐश्वर्या आणि रवीनाने सोबत अनेक सेल्फीही काढले. कतरिनाचा भारतीय लूक चाहत्यांना पसंत केला जात आहे. तिने सी-ग्रीन कलरची साडी नेसली होती आणि विकी तिच्यासोबत काळ्या कुर्त्यात दिसत होता. काजोलने काळ्या आणि त्वचेच्या रंगाची चमकणारी साडी घातली होती, तर माधुरीही स्काय ब्लू कलरच्या शिमर साडीत दिसली होती.
सुहाना अली खान आणि जान्हवी कपूरही इंडियन फेस्टिव्ह लूकमध्ये दिसल्या. जान्हवीने (Janhavi Kapoor) हिरवा चकचकीत लेहेंगा घातला होता, तिची बहीण खुशीनेही पांढऱ्या रंगाची बहुरंगी नक्षी असलेली साडी घातली होती. सिक्वेन्स वर्कसह स्किन कलरच्या साडीमध्ये सुहानाने तिचा स्टायलिश लूक दाखवला.