Bollywood Actress Marriage Divorced Husband: बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या लाइफस्टाइलमुळेही नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे चाहतेही त्यांच्या आवडत्या स्टार्सबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी घटस्फोटित पुरुषांशी लग्न केलं आहे (Actresses Who Married Divorced Men) आणि त्यांच्यासोबत आज त्यांनी सुखाचा संसार मांडला आहे. (bollywood actresses who married divorced men kareena kapoor saif ali khan raj kundra shilpa shetty)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. तसंच काहीसं या बॉलीवूड कपल्सबद्दल (Bollywood Couples) आहे. आपला पार्टनर घटस्फोटीत असला म्हणून काय झालं प्रेम, काळजी आणि मैत्री याच्याही पलीकडील असलेलं विश्वासाचं नातं या कपल्सना सर्वात जास्त महत्वाचं वाटलं. चला तर मग बघूया कोण आहेत हे बॉलीवूडचे लाडके कपल्स. 


करीना कपूर (Kareena kapoor) - 
यातील पहिली जोडी आणि सैफ आणि करिनाची. आज बॉलीवूडमध्ये हे जोडपं सर्वात जास्त लोकप्रिय आहे. रेफ्युजी (Refujee) या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या करिनाने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडमधील सर्वात हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. करिनाने सैफ अली खानसोबत (Kareena Kapoor Marriage) लग्न केले आहे. यापूर्वी सैफने अमृता सिंगसोबत लग्न केले होते. त्यांना सारा अली खान (Sara Ali Khan) आणि इब्राहिम अली खान (Abrahim Ali Khan) ही दोन मुले आहेत. 


शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) - 
शिल्पा शेट्टीचे लाखो चाहते आहेत. मागील वर्षी शिल्पा शेट्टी ही अभिनेत्री दोन कारणांमुळे चर्चेत आली होती. एक म्हणजे आपली बहीण शषिमा शेट्टी हीची बिग बॉसमधील एन्ट्री (Shashmita Shetty In Bigg Boss) आणि आपल्या पतीचं पॉर्नोग्राफी प्रकरण (Raj Kundra Case). शिल्पा शेट्टीनं बिग ब्रदर (Big Brother) जिंकून वेगळाच इतिहास निर्माण केला. तेव्हापासून ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेकदा चर्चेत असते. 90 च्या दशकात तिचं नावं अनेकदा बऱ्याच लोकप्रिय अभिनेत्यांशी जोडलं गेलं होतं. तिनं राज कुंद्राशी (Raj Kundra and Sushamita Shetty) लग्न केलं परंतु राज हा त्यांच्या लग्नाआधी विवाहित होता. राजची पत्नी कविता (Raj Kundra First Wife) हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यानं शिल्पाला आपला साथीदार बनवलं. 


राणी मुखर्जी (Rani Mukherji) - 
बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीनेही तिच्या लग्नाला घेऊन अनेकदा लाईमलाईटमध्ये आली आहे. यश चोप्रा (Yash Chopra Son) यांचा मुलगा आणि प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राशी (Aditya Chopra) तिचं लग्न झालं आहे. आदित्यने आपल्या पहिल्या पत्नीला पायलला (Aditya Chopra First Wife) घटस्फोट देऊन राणीसोबत लग्न केलं. त्याचं पहिलं लग्न केवळ सात वर्षे टिकलं. आज दोघं अत्यंत सुखात आहेत. 


लारा दत्ता (Lara Dutta) - 
लाराने 'अंदाज' (Andaaz) चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार (Akashay Kumar) दिसला होता. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर लारानं टेनिस खेळाडू महेश भूपतीसोबत लग्न केले आहे. महेशचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्यांनी श्वेता जयशंकरला (Shweta Jayshankar) घटस्फोट दिला होता. श्वेताने लारावर घर फोडल्याचा आरोपही केला होता.