मुंबई : #HBDSuperStarRajinikanth  कलाविश्वात आलेल्या कलाकारांना मिळणाऱ्या प्रसिद्धीविषयी सांगावं तर, प्रत्येकाच्याच बाबतीत ही गणितं तशी फार वेगळी. त्यातकी काही मंडळींनी मात्र प्रसिद्धीच्या परिभाषाच बदलल्या. याच मंडळींपैकी असणारं एक नाव म्हणजे सुपरस्टार रजनीकांत. थलैवा, सुपरस्टार, रजनी अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचा आज वाढदिवस. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाहत्यांकडून देवत्व मिळालेल्या रजनीकांत यांच्यावर आज त्यांच्या ६८व्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. चित्रपट वर्तुळातील प्रत्येकजण या महान व्यक्तीला आपल्या परिने शुभेच्छा देण्यात व्यग्र आहे. 


शिवाजीराव गायकवाड ते सुपरस्टार रजनीकांत होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास पाहता अनेकांनाच त्यांचा हेवा वाटतो. पण, हा प्रवाच तितकासा सोपा नव्हता. रजनीकांत हे सुरुवातीचे काही दिवस बस कंडक्टर म्हणूनही काम करत होते. पण, अभिनय आणि चित्रपट जगताप्रती असणारी त्यांची ओढ पाहता या कलाविश्वात त्यांनी आपली अशी वेगळी ओळख प्रस्थापित केली. 


प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यापुरताच मर्यादित न राहता त्यांनी समाजसेवेसाठीही पुढाकार घेतला. अशा या मोठ्या मनाच्या अभिनेत्याला त्यांच्या कलाकार मित्रांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. कमल हसन, अमिताभ बच्चन यांनी आपल्या मित्राला चक्क तामिळ भाषेत शुभेच्छा दिल्या. तर मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून थलैवासोबतचा एक फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. 








सौंदर्या रजनीकांत, धनुष, महेशबाबू आणि इतरही बरीच मंडळी य़ा खास दिवशी शक्य त्या सर्व मार्गांनी आपल्या शुभेच्छा रजनीकांत यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. ट्विटरवर रजनी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  #HBDSuperStarRajinikanth #HappyBirthdaySuperstar #HBDthalaiva असे हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आहेत. शुभेच्छांचा हा ओघ पाहता आता खुद्द थलैवा, या खास दिवशी हितचिंतकांना काय संदेश देणार हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.