मुंबई : बॉलिवूडमध्ये फेमिनिस्ट चित्रपटांमधून आपली वेगळी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री कीर्ती कुल्हारीबाबत फारसं काही चित्रपट प्रेमींना माहिती नाही आहे. तिने मोजकेच चित्रपट केले पण यात आपल्या अभिनयाची चूणुक दाखवली. चित्रपटासोबत तिची लव्ह लाईफ देखील जास्त चर्चेत नव्हती. नुकताच तिने 30 मे ला वाढदिवस साजरा केला, यानिमित्त तिच्या फिल्मी लाईफ आणि रिअल लाईफ बाबत माहिती देणार आहोत.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'या' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री 
अभिनेत्री कीर्ती कुल्हारीने 2010 मध्ये आलेल्या खिचडी द मूव्हीमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तसेच कीर्तीने इंदू सरकार, पिंक, मिशन मंगल आणि उरी यासारख्या हिट चित्रपटात भूमिका करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. आता तिची बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 


2016 मध्ये बांधली लग्नगाठ  
मूळची राजस्थानची असलेल्या कीर्ती कुल्हारीची एका जाहिरातीत काम करताना साहिल यांची भेट झाली. या भेटीनंतर दोघांनीही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. यानंतर कीर्तीने साहिलला लग्नासाठी प्रपोज केलं. दोघांनी 2016 मध्ये लग्नगाठ बांधली.  


पाच वर्षांनंतर झाला घटस्फोट
लग्नाच्या पाच वर्षानंतर म्हणजेच 2021 ला कीर्ती कुल्हारीच्या एका पोस्टने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले, जेव्हा तिने तिच्या पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट न घेता अभिनेत्रीने पतीला सोडले. पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आली होती. आता कीर्तीला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं बोलणं आवडत नाही.त्यावेळी अभिनेत्रीने घटस्फोटाचे कारण सांगितले नसले तरी तिच्या घटस्फोटाची खुप चर्चा रंगली होती.  


दरम्यान नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ह्यूमन या वेब सिरीजमध्ये अभिनेत्रीने तिच्या उत्कृष्ट अभिनयाची झलक दाखवली आहे. ती यापूर्वी क्रिमिनल जस्टिस: बिहाइंड क्लोस्ड डोअर्स, बार्ड अँड ब्लड आणि फोर मोअर शॉर्ट्समध्ये दिसली होती.