मुंबई : बुधवारी 'एएनआय' या वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेर प्रदेशातील टप्पल येथे एका अडीच वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला. अलिगढ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ मे रोजी या प्रकरणी अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनन्वित अत्याचारांमधून तिची हत्या करण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. संबंधित प्रकरणी दोन इसमांवर गुन्हा दाखल करत त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे. 


पालकांनी घेतलेलं १० हजार रुपयांचं कर्ज फेडता न आल्यामुळे तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अतिशय निर्घृणपणे करण्यात आलेल्या या हत्येचा सोशल मीडियावर तीव्र निषेध करण्यात येत आहे. अनेकांनीच त्या चिमुरडीला न्याय मिळाला यासाठी तिच्या नावाच्या हॅशटॅगसह एक मोहिम सुरु केली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा यात मागे नाहीत. रितेश देशमुख, अनुपम खेर, स्वरा भास्कर, हुमार कुरेशी य़ांनी ट्विट करत झाल्या प्रकाराविषयी तीव्र संताप आणि निराशा व्यक्त केली आहे. 


आपण आपल्या मुलांसाठी नेमकं कोणत्या प्रकारचं असुरक्षित विश्व तयार करत आहोत...? असा प्रश्न उपस्थित करत अभिनेता रितेश देशमुख याने त्या चिमुरडीला न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला. तर, अशी कृत्य करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, असं म्हणत जेनेलिया देशमुख हिनेही संताप व्यक्त केला. 




'नराधनामांना जन्माला न घालता तुम्ही या जगाच्या हिताताच विचार करा, कारण जर तुम्ही त्यांचं नीट संगपोपन करु शकत नाही तर त्यांना जन्मही देऊ नका', असं आवाहन कोयना मित्राने केलं. सोबतच तिने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या त्या गुन्हेगारांचा फोटोही जोडला. अभिनेत्री हुमा कुरेशीने त्या चिमुऱडीची माफी मागत आपण, तिचं संरक्षण करण्यात असमर्थ ठरल्याची खंत व्यक्त केली. 








फक्त सेलिब्रिटीच नव्हे, तर सोशल मीडियावर अनेकांनीच उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या धक्कादायक प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला. यावेळी आरोपींना सर्वाधिक कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी प्रकर्षाने करण्यात आली. दरम्यान, संपूर्ण देशभरात सध्या या प्रकरणाला हवा मिळत असून पुन्हा एकदा सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अतिशय क्रूर अशा या घटनेमुळे सारा देश हळहळला आहे.