मुंबई : बॉलिवूड म्हणा किंवा आणखी इतर कोणतं कलाविश्वं. प्रत्येक ठिकाणी सेलिब्रिटी वर्तुळात असणाऱ्या चर्चा आणि सेलिब्रिटींच्या मानधनाचा आकडा कायमच चाहत्यांना थक्क करताना दिसतो. शाहरुख, सैफसारखे अभिनेते वैयक्तिक कमाईच्या बाबतीत बरेच पुढे आहेत. पण, ही मंडळी त्यांच्या जोडीदारासोबत जितकी कमाई करतात ती प्रचंड लक्षवेधी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखची एकट्याची कमाई, 690 मिलियन डॉलर इतकी आहे. भारतीय परिमाणामुसार हा आकडा 5 हजार कोटी रुपयांपर्यंत जातो. 


त्याची पत्नी, गौरी ही इंटेरियर डिझायनर असून, या दोघांची कमाई त्यांना बी टाऊनमधील सर्वात श्रीमंत जोडीच्या स्थानावर पोहोचवते. 



अनुष्का आणि विराटच्या कमाईबद्दलही नव्यानं काही सांगण्याची गरज नाही. तिथं विराट क्रिकेट, जाहिराती आणि हॉटेलिंग उद्योगातून दमदार कमाई करतो.


तर अनुष्का चित्रपटांमधून कोट्यवधी रुपयांचं मानधन घेण्यासोबतच निर्मिती संस्थेतूनही ती त्याला कमाईच्या बाबतीत काँटे की टक्कर देताना दिसते. 



निर्मिती संस्थेची मालकी असणारा आदित्य चोप्रा याला त्याची पत्नी आणि अभिनेत्री राणी मुखर्जी हीसुद्धा विविध चित्रपट, ब्रँड आणि व्यवसायाच्या माध्यमातून त्याच्या आर्थिक मिळकतीत भर टाकताना दिसत आहे.



2020 मध्ये खिलाडी कुमार यानं 48.5 मिलियन डॉलर इतकी कमाई केली होती. चित्रपटांमध्ये अभिनय करण्याव्यतिरिक्त तो निर्मिती संस्थेतही गुंतवणूक करताना दिसत आहे. 



खिलाडी कुमारची पत्नी, ट्विंकल खन्ना हिसुद्धा लेखन आणि इतरही काही मार्गांनी त्याला आर्थिक हातभार लावते. 


अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण या दोघांनीही चित्रपटांतील भूमिका साकारत बरीच दमदार कमाई केली. चित्रपटांव्यतिरिक्तही ही जोडी निर्मिती, ब्रँडिंग अशा मार्गानंही पैसे कमवताना दिसते. 



बॉलिवूडचा नवाब अशी ओळख असणाऱ्या अभिनेता सैफ अली खान याची पत्नी अभिनेत्री करिना कपूर खान, हिचं वार्षिक उत्पन्न 400 कोटी इतकं आहे.