Bollywood celebs intimate scenes : बॉलीवूडमध्ये इन्टिमेट सीन्स देणं हल्ली कॉमन झालं आहे. त्यासाठी एखादा इन्टिमेट सिन देण्याकरिता कलाकारांसोबत तसे इन्टिमेट डिरेक्टर्सही असतात. परंतु पुर्वी असा काळ होता जेव्हा इन्टिमसी डिरेक्टर असा कोणताच प्रकार नव्हता. तेव्हा अनेकदा रेप सीन देणं, किसिंग सिन देणं आणि सेक्स सीन देणं कलाकारांना अवघड ठरले होते. (bollywood celebrity who losses control while giving intimate scenes gets trolled top bollywood celebs)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यापैंकी अनेक टॉपचे बॉलीवूड कलाकार आहेत ज्यांना इन्टिमेट सीन देणं महागात पडले होते आणि आजही त्यांना त्यावरून ट्रोल केले जाते. तर काहींना इन्टिमेट सीन देताना आपल्यावर नियंत्रणही ठेवता आले नव्हते. 


'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिव' सिनेमागृहात रिलीज झाला आहे. रणबीर कपूरचा आलिया भट्टसोबतचा हा पहिलाच चित्रपट आहे, जो त्यांच्या लग्नाआधी शूट करण्यात आला होता. चित्रपटातल्या रणबीर आणि आलियाच्या केमिस्ट्रीचे कौतुक केले जात आहे. हा चित्रपट अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे, या चित्रपटापुर्वी रणबीरने 'वेकअप सिड' आणि 'ये जवानी है दीवानी' हे चित्रपट केले होते.


रणबीर कपूर (Ranbir Kapoor): 'ये जवानी है दिवानी'मध्ये (Yeh Jawaani Hai Deewani) रणबीर कपूरचा एक इंटिमेट सीन होता ज्यावरून त्याला ट्रोल करण्यात आले होते. हा इन्टिमेट सीन त्यानं त्याच्या एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादूकोनसोबत (Deepika Padukone) दिला होता.  याच चित्रपटात रणबीरनं इव्हलिन शर्मासोबत एक इन्टिमेट सीन दिला होता. समोर आलेल्या माहितीनुसार तो सीनमध्ये इतका हरवला होता की त्याला दिग्दर्शकाचा कटही ऐकू आला नाही. 


सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra): सिद्धार्थ मल्होत्राचा ​ 2017 मध्ये  'अ जेंटलमन' (A Gentlemen) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात त्याचा जॅकलीन फर्नांडिससोबत एक इंटिमेट सीन होता ज्यादरम्यान दिग्दर्शकाने कट सांगितल्यानंतरही तो बराच वेळ थांबला होता.


टायगर श्रॉफ (Tiger Shroff) : टायगर श्रॉफ आणि जॅकलिन फर्नांडिस (Jackline Fernandes) यांनी 2016 मध्ये आलेल्या ए फ्लाइंग जट (A flying Jat) या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात दोघांमध्ये एक किस सीन होता ज्यावरून ते दोघंही ट्रोल झाले होते.