कपिल शर्माच्या कमाईचा आकडा वाचून धक्काच बसेल
कपिल शर्माने त्याच्या कारकिर्दीत एक वेगळीच उंची गाठली.
मुंबई : आपल्या अनोख्या विनोदी शैलीमध्ये हिंदी चित्रपट आणि कलाविश्वात स्थान मिळवणाऱ्या कपिल शर्माने त्याच्या कारकिर्दीत एक वेगळीच उंची गाठली. संघर्षाचा काळही त्याने यादरम्यान पाहिला. कपिलने नव्या जोमाने आणि उत्साहात करिअरच्या कठीण वाटाही अगदी सहजपणे पार केल्या.
आतातर, या विनोदवीराने थेट कमाईच्या बाबतीतही भल्याभल्यांना मागे टाकलं आहे. सहसा सेलिब्रिटींच्या मानधनाविषयी अनेकांनाच कुतूहल असतं. त्यामुळे कपिलच्या मानधनाचा नेमका आकडा किती असाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना?
कपिल शर्मा त्याच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त इतरही काही कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांसमोर येतो. माध्यमांमध्ये असणाऱ्या वृत्तानुसार कपिल, त्याच्या कार्यक्रमाच्या एका भागासाठी घेत असणाऱ्या मानधनाचा आकडा हा थक्क करणारा आहे. कपिल घेत असणारा मानधनाचा आकडा हा तब्बल, ८०-९० लाख रुपये इतका असल्याचं म्हटलं जात आहे.
वाचा : भारतीय संविधानाविषयीच्या रंजक गोष्टी वाचून व्हाल थक्क
कार्यक्रम, चित्रपटांव्यतिरिक्त तो काही ब्रँड्सचा ब्रँड ऍम्बेसेडरही आहे. त्यामुळे या मानधनाचीही त्याच्या कमाईमध्ये भर पडत असणार यात शंका नाही. कपिलच्या संपत्तीच्या आकड्याविषयी अनिश्चितता असली तरीही हा आकडा आतापर्यंत १७० कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जात आहे. वर्षाला तो जवळपास ३० कोटी रुपये कमवतो. या साऱ्यामध्ये त्याची के9 प्रोडक्शन्स नावाची एक निर्मिती संस्थाही आहे. त्यामुळे मानधनाच्या बाबतीत हा अवलिया सर्वांना थक्क करतोय असंच म्हणावं लागेल.