Guess Who :  सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हा अभिनेता ओळखायचा आहे.  


फोटोत काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोत तुम्ही पाहू शकता, दोन लहान मुले उभी आहेत. ही दोन्ही मुले भाऊ आहेत आणि मोठा भाऊ बॉलिवूडवर (Bollywood) राज्य करतो. त्याची फॅन फॉलोइंग देशातच नाही तर जगभरात आहे.बॉलिवूडमध्ये या अभिनेत्यांच्या कुटूंबियांचा मोठा दबदबा आहे. यातील मोठ्या भावाला चाहते भाईजान म्हणतात.त्याने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. सर्व बड्या अभिनेत्रींसोबत त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच अभिनेत्याच्या नावाने बॉलिवूडमध्ये सिनेमे चालतात, असे समीकरण आहे. 


'हा' आहे अभिनेता?


जर तुम्ही अजुनही ओळखत नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा मुलगा दुसरा कोणी नसून बॉलिवूडच्या (Bollywood)  दबंग अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बालपणीचा फोटो आहे. या फोटोत त्याच्यासोबत सोहेल खान आहे.या फोटोमध्ये पांढर्‍या शर्टमध्ये पहिला उभा असलेला मुलगा सलमान खान आहे. सलमान खान लेखक सलीम खान यांचा मुलगा आहे. सलमान खानचे खरे नाव अब्दुल रशीद सलीम सलमान आहे. सलमान खानने (Salman Khan) 1988 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बीवी हो तो ऐसी हा त्यांचा पहिला चित्रपट होता.


दरम्यान सलमान खानच्या (Salman Khan) वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच कतरिना कैफसोबत टायगर 3 मध्ये दिसणार आहे. तसेच सध्या तो होम प्रॉडक्शन 'कभी ईद कभी दिवाळी'चे शूटिंगही करत आहे. यासोबतच तो नो एन्ट्री आणि किक २ मध्येही काम करणार आहे. या त्याच्या चित्रपटाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.