आता भैय्यांचं काय, पल्लवी जोशीच्या पतीचा सवाल
गुंड पक्ष सत्तेत आल्यानंतर माझ्यासारख्या....
मुंबई : राज्याच्या राजकारणात सत्तास्थापनेच्या वाटेतील अनेक अडथळे दूर केल्यानंतर अखेर महाविकासआघाडी म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाची हातमिळवणी झाली. राज्यत सरकारही स्थापन झालं. गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी एका भव्य सोहळ्यात शपथ घेत येत्या काळात राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडण्याची हमी जनतेला दिली.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर येणार याची अधिकृत घोषणा झाल्यानतंर सोशल मीडियावर अनेकांनीच त्यांच्या नव्या कारकिर्दीसाठी कुतूहलाची भावना व्यक्त केली. कर काहींनी मात्र खटकणाऱ्या सूरात आपले प्रश्न उपस्थित केले. यामधीलच एक नाव आहे, मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री पल्ली जोशी हिच्या पतीचं. म्हणजेच विवेक अग्निहोत्रीचं.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर येण्यापूर्वी ट्विट करत विवेकने सर्वांचं लक्ष वेधलं. ट्विटच्या माध्यमातून त्याने काही प्रश्नही उपस्थि केले. ते मुख्यमंत्रीपदावर येताच शहरांची नावं बदलण्यास सुरुवात करतील, मराठी माणूस आणि अशा इतरही काही विषयांव निर्णय घेतील असं म्हणत हा गुंड पक्ष सत्तेत आल्यानंतर माझ्यासारख्या भैय्यांचं (उत्तर भारतीयांचं) काय? या पक्षाच्या सत्तेत सुरक्षित असतील का? असा प्रश्न त्याने उपस्थित केला.
त्याच्या या प्रश्नाचं उत्तर आता नेमकं कोण देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठकणार आहे. एकिकडे सत्तेत आलेलं महाआघाडीचं सरकार आणि दुसरीकड़े विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्यासारखे इतरही काहीजण पाहता राज्याच्या राजकारणात भविष्यात नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.