मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक संतोष गुप्ता (Santosh Gupta) यांच्या पत्नीसह मुलीने आत्महत्या केली आहे. संतोष गुप्ता यांची पत्नी बऱ्याच काळापासून किडनीच्या त्रासाने ग्रस्त होती. अंधेरीत 55 वर्षीय संतोष गुप्ता यांच्या पत्नीने आपल्या राहत्या घरी मुलीसोबत स्वतःला पेटवून घेतलं आहे. (Santosh Gupta wife and daughter Suicide)  पोलिसांना बुधवारी याबाबत माहिती मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अस्मिता गुप्ता असं त्यांचं नाव असन सोमवारी त्यांनी आत्महत्या केली. अस्मिता आणि सृष्टी या अंधेरी पश्चिमेकडील डीएन नगर भागात राहत होत्या. त्यांच्या शेजाऱ्यांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात नेण्यात आले. अस्मिता यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.


सृष्टी गुप्ता 70 टक्के भाजली होती. सृष्टीला ऐरोली राष्ट्रीय बर्न्स सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी तिचीही प्राणज्योत मालवली. किडनीच्या त्रासाला कंटाळल्यामुळे अस्मिता यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर आईचे आजारपण पाहून व्यथित झालेल्या सृष्टीनेही आयुष्य संपवल्याची माहिती आहे.


संतोष गुप्ता यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच गदर, घातक, अंदाज़ अपना अपना, बिच्छू, हफ्ता बंध यासारख्या सिनेमात संतोष गुप्ता यांनी भूमिका देखील सादर केल्या आहेत. याशिवाय तमस, स्वराज, लाल दुपट्टा मलमलका यासारख्या टेलिफिल्म्स, तर टिपू सुलतान, होनी अनहोनी, युग यासारख्या मालिकांमध्येही गुप्तांनी काम केलं आहे.