GQ फॅशन नाइट : दीपिका पादुकोणवर सगळ्यांचा नजरा, काही स्टारही सहभागी
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा नवा सिनेमा `पद्मावती` लवकरच रिलीज होत आहे. हा सिनेमा १ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या हा सिनेमा रिलीज होण्याआधी जीक्यू फॅशन नाइटमध्ये ही जोडी दिसली. त्यावेळी दीपिकावर सगळ्यांचा नजरा स्थिरावल्या होत्या.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा नवा सिनेमा 'पद्मावती' लवकरच रिलीज होत आहे. हा सिनेमा १ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या हा सिनेमा रिलीज होण्याआधी जीक्यू फॅशन नाइटमध्ये ही जोडी दिसली. त्यावेळी दीपिकावर सगळ्यांचा नजरा स्थिरावल्या होत्या.
या सिनेमात दीपिका ही राणी पद्मावती तर शाहिद हा महाराजा रावल रतन सिंग यांची भूमिका करताना दिसणार आहेत. त्या आधी शाहिद कपूर आणि दीपिका पदुकोण GQ फॅशन नाइटमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत अनेक सितारे सहभागी झाले होते. यावेळी दीपिकाने परिधान केलेल्या इंडो-वेस्टर्न साडीचा लूक प्रत्येकाची नजर वेधून घेत होता. त्यामुळे अनेकांच्या नजरा दीपिकावर रोखलेल्या दिसून आल्यात.
दीपिका (फोटो सौजन्य - आयएएनएस)
दीपिकाने डिझायनर सब्यसांचीद्वारे डिझाइन केलेली इंडो-वेस्टर्न साडी परिधान केली होती.
शाहिद कपूर (फोटो सौजन्य - आयएएनएस)
शाहिद कपूर गौरव गुप्तासाठी रॅम्पवर उतरला होता. ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये तो छान दिसत होता.
इरफान खान (फोटो सौजन्य - आयएएनएस)
डब्बू रतनानी आणि मनीषा डी. रतनानी (फोटो सौजन्य - आयएएनएस)
मंदिरा बेदी (फोटो सौजन्य - आयएएनएस)
शाहिद आणि दीपिका यांच्यासह या शो मध्ये इरफान खान, मंदिरा बेदी, डब्बू रतनानी सहभागी झाले होते. असे सांगितले जात आहे की, इरफान खानची फिल्म 'करीब-करीब सिंगल' रिलीज झाली आहे. याबरोबर शाहिद आणि दीपिकाच्या सिनेमात रणवीर सिंगही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.