कपूर कुटुंबात येणार नवी सून? आलियाच्या उपस्थितीत `ती` तिथं आली आणि...
Entertainment News : कपूर कुटुंबामध्ये सणवार साजरा करण्याचा मुद्दा आला की, एकच कल्ला असतो. सेलिब्रिटींची मांदियाळी असते आणि अर्थातच चाहत्यांमध्ये या कुटुंबाबद्दल कमालीचं कुतूहलही असतं.
Entertainment News : हिंदी कलाजगामध्ये काही कुटुंब कायमच चाहत्यांच्या आकर्षणाचा विषय ठरतात. यापैकीच एक म्हणजे कपूर कुटुंब होळी म्हणू नका, गणेशोत्सव किंवा मग दिवाळी... कपूर जिथेजिथे, कलाकारांची मांदियाळी तिथेतिथे असंच काहीसं चित्र पाहायला मिळतं. यंदाचं वर्षही त्यासाठी अपवाद ठरलं नाही. किंबहुना यंदाचं वर्ष जरा जास्तच खास ठरलं, कारण कपूर कुटुंबातीलच एका सदस्यानं नकळतच त्याच्या प्रेमाची जाहीर कबुलीही दिली.
थोडक्यात 'तिला' पाहिल्यानंतर ही या कुटुंबाची नवी सून का? असाच प्रश्न चाहत्यांनाही पडला. करीना कपूर खानच्या घरी यंदाच्या दिवाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अभिनेता आणि रणबीर कपूरचा आतेभाऊ आदर जैन एका तरुणीसोबत दिसला. तिचा हात हातत घेऊनच तो पार्टीसाठी आला आणि या जोडीचे असंख्य फोटो तिथं उभ्या असणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी घेतले. पार्टीमध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर, करिष्मा कपूर, अरमान जैन आणि कपूर कुटुंबातील इतर सदस्यांसोबत ही तरुणी चांगलीच रमली होती.
इथं आदर आणि त्याच्यासोबत दिसलेल्या त्या तरुणीच्या नात्याविषयी असंख्य प्रश्न विचारले जात असतानाच तिथे खुद्द या अभिनेत्यानेच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली, जिथं तिचा चेहरा न दाखवताच त्यानं नात्याची कबुली दिली. 'माझ्या आयुष्यातील प्रकाश....' असं कॅप्शन लिहित त्यानं मनातील भावनांना दिवाळीच्या निमित्तानं वाट मोकळी करून दिली.
हेसुद्धा वाचा : 'मी ऐश्वर्या रायशी लग्न केलं तर...'; अब्दुल रझाकच्या अभद्र वक्यव्यावर पाकच्या खेळाडूंनी कुटल्या टाळ्या
आदरच्या या पोस्टवर कमेंट करत रणबीरची बहीण रिद्धीमा हिनं लिहिलं, तुझ्या जीवताली या 'प्रकाशा'ला भेटायचीच वाट पाहतेय. बस्स, मग काय तिथं आदरचं तरुणीसोबत दिसणं, इथं त्यानं पोस्ट लिहिणं या गोष्टींचा असा मेळ साधला गेला की एका नव्या नात्याचीच माहिती सर्वांना मिळाली. आदर जैनसोबत दिसणारी ती तरुणी होती आलेखा अडवाणी.
27 वर्षीय तारा सुतारियासोबतच्या ब्रेकअपनंतर आदर पुन्हा प्रेमात...
आदर जैन आणि अभिनेत्री तारा सुतारिया बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. कपूर कुटुंबातील अनेक समारंभ आणि कार्यक्रमांना ताराची उपस्थिती असायची. पण, ही जोडी लग्नबंधनात अडकणार असं वाटत असतानाच तारा आणि आदरनं या नात्यातून वेगळ्या वाटा निवडल्या. हल्लीच दिलेल्या एका मुलाखतीमध्येही तारानं आपण रिलेशनशिपमध्ये नसल्याचं स्पष्ट केल्याचं पाहायला मिळालं होतं. तारासोबतचं नातं तुटल्यानंतर आता आदर मात्र पुन्हा प्रेमात असल्याचच पाहायला मिळत आहे.