मुंबई : सारा अली खान... बस्स नाम ही काफी है... असं म्हणत सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या मुलीची म्हणजेच साराची ओळख करुन दिली तर त्यात वावगं असं काहीच ठरणार नाही. हिंदी कलाविश्वात पदार्पणासाठी सज्ज असणाऱ्या साराचा अंदाज सध्या अनेकांचच लक्ष वेधत आहे. मग ते तिचं स्टाईल स्टेटमेंट असो किंवा आगामी 'केदारनाथ' या चित्रपटातील अभिनय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक गोष्टीवर आपली अशी वेगळी छाप सोडणाऱ्या साराचा आणखी एक वेगळा अंदाज सध्या पाहायला मिळत आहे. अर्थात त्यामागेही एक कारण आहे. ते कारण म्हणजे तिचा आगामी चित्रपट. 


साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ म्हणजेच चित्रपटाचा डायलॉग प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या अवघ्या काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये ती साकारत असलेल्या 'मुक्कू'चं तिच्या वडिलांसोबतचं नातं नेमकं कसं आहे, यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. 


'मुक्कू' हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, हेच जणू या व्हिडिओच्या माध्यमातून कळत आहे. त्यामुळे आता ७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'मुक्कू'च्या वाट्याला यश येतं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 



अभिषेक कपूर दिग्दर्शित 'केदारनाथ' या चित्रपटाचं कथानक २०१३ मध्ये केदारनाथ मंदीर आणि परिसरात आलेल्या महाप्रलयाच्या घटनेचा आधार घेत साकारण्यात आलं आहे. सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्यासोबत ती स्क्रीन शेअर करणार असून, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापसूनच या जोडीची अनेकांनी प्रशंसा केल्याचं पाहायला मिळालं होतं.